रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नितीन गडकरी यांच्या हस्ते 'आझादी का अमृत महोत्सव' प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 13 AUG 2022 5:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरातील मध्यवर्ती बस स्थानक (गणेशपेठ) येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) आयोजित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

गडकरी यांनी या कार्यक्रमात उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा गौरव केला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमात, स्वतंत्र भारताच्या गौरवशाली प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या भारतातीयांच्या स्मरणार्थ, देशभरातील 75 बस स्थानकांवर प्रदर्शनांचे आयोजन केले जात आहे. 

हे प्रदर्शन स्वातंत्र्यलढ्याचे आणि भारताला स्वातंत्र्य प्रदान करण्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन योगदान दिले त्या शूर वीरांचे  चित्रण आहे. यासोबतच, हे प्रदर्शन संविधान निर्मिती आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपल्या सर्व नेत्यांच्या, समाजाच्या सर्व स्तरातील स्त्री-पुरुषांच्या योगदान अधोरेखित करेल.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851556) Visitor Counter : 176