आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला एकूण 206.88 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.95 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 1,31,807

गेल्या 24 तासांत, 12,751 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.51 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.69 टक्के

Posted On: 09 AUG 2022 9:21AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  206.88 कोटीहून (2,06,88,49,775) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,74,59,679 सत्रांतून हे साध्य केले आहे.

12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक 2लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.95 कोटी (3,95,81,306) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19  ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची खबरदारीची मात्रा  देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412739

2nd Dose

10096247

Precaution Dose

6482489

FLWs

1st Dose

18432175

2nd Dose

17680866

Precaution Dose

12596212

Age Group 12-14 years

1st Dose

39581306

2nd Dose

28816863

Age Group 15-18 years

1st Dose

61385582

2nd Dose

51564142

Age Group 18-44 years

1st Dose

559887543

2nd Dose

510317252

Precaution Dose

35105420

Age Group 45-59 years

1st Dose

203761918

2nd Dose

195654217

Precaution Dose

22077781

Over 60 years

1st Dose

127490906

2nd Dose

122278479

Precaution Dose

35227638

Precaution Dose

11,14,89,540

Total

2,06,88,49,775

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या1,31,807 इतकी आहे. देशातील पाॅझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.31 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण  कोविडमुक्त होण्याचा दर 98.51 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत,16,412 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या  आरंभापासून) आता 4,35,16,071 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 12,751 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 3,63,855 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.85 कोटी (87,85,52,017) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.69 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.50 टक्के इतका नोंदवला गेला आहे

***

S Patil/Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850171) Visitor Counter : 118