गृह मंत्रालय
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या जनतेला शुभेच्छा
भारताचे हातमाग क्षेत्र आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट हा दिवस 1905 मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे स्मरण करण्यासाठी आणि भारतीय प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून जाहीर केला.
स्वदेशी विणकरांनी विणलेल्या हातमाग उत्पादनांचा वापर करण्यासाठी देशवासियांना प्रोत्साहन देण्याचा देखील त्यामागे उद्देश आहे.
आजच्या 8व्या राष्ट्रीय हातमाग दिनी आपण सर्व, आपल्या हातमाग वारशाचे जतन करण्याच्या आणि चालना देण्याच्या आणि विणकरांचे, विशेषतः महिला विणकरांचे सक्षमीकरण करण्याच्या नरेंद्र मोदी प्रणित सरकारच्या संकल्पाला पुढे नेण्यासाठी एकजूट होऊया
Posted On:
07 AUG 2022 12:55PM by PIB Mumbai
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या निमित्ताने केलेल्या ट्वीट्सच्या मालिकेमध्ये म्हटले आहे, “भारताचे हातमाग क्षेत्र आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट हा दिवस 1905 मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचे स्मरण करण्यासाठी आणि भारतीय प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून जाहीर केला.”
“स्वदेशी विणकरांनी विणलेल्या हातमाग उत्पादनांचा वापर करण्यासाठी देशवासियांना प्रोत्साहन देण्याचा देखील त्यामागे उद्देश आहे. आजच्या 8व्या राष्ट्रीय हातमाग दिनी आपण सर्व, आपल्या हातमाग वारशाचे जतन करण्याच्या आणि चालना देण्याच्या आणि विणकरांचे, विशेषतः महिला विणकरांचे सक्षमीकरण करण्याच्या नरेंद्र मोदी प्रणित सरकारच्या संकल्पाला पुढे नेण्यासाठी एकजूट होऊया.”, असं केंद्रीय गृहमंत्र्यानी म्हटलं आहे.
***
R.Aghor/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849416)
Visitor Counter : 279