गृह मंत्रालय
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल जगदीप धनखड यांचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन
एका शेतकऱ्याचा सुपुत्र असलेल्या जगदीप धनखड यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवड ही देशासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे
धनखड हे त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सतत लोकांशी जोडलेले राहिले आहेत, मुलभूत समस्यांविषयीची त्यांची समज आणि त्यांचा अनुभव राज्यसभेच्या कामकाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड हे राज्यघटनेचे आदर्श पालनकर्ते ठरतील असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्ष, इतर पक्ष आणि संसद सदस्यांनी धनखड यांना पाठींबा दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 8:24PM by PIB Mumbai
जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.ट्वीट संदेशांच्या मालिकेत केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, “एका शेतकऱ्याचा सुपुत्र असलेल्या जगदीप धनखड यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड होणे ही बाब देशासाठी अत्यंत आनंदाची आहे. धनखड हे त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सतत लोकांशी जोडलेले राहिले आहेत, मुलभूत समस्यांविषयीची त्यांची समज आणि त्यांचा अनुभव राज्यसभेच्या कामकाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849210)
आगंतुक पटल : 275