जलशक्ती मंत्रालय
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल वर 4 थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022
Posted On:
05 AUG 2022 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022
जल शक्ती मंत्रालयाच्या जल संपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 4 थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठीच्या प्रक्रियेची घोषणा केली आहे. या पुरस्कारांसाठीचे सर्व अर्ज केवळ ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (www.awards.gov.in) द्वारे स्वीकारले जातील. अधिक तपशील सामान्य नागरिक या पोर्टलवर किंवा या विभागाच्या वेबसाईटवर (www.jalshakti-dowr.gov.in) पाहू शकतील. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2022 ही आहे.
पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे:
कुठलेही राज्य, जिल्हा, ग्राम पंचायत, शहरी स्थानिक संस्था, माध्यम, शाळा, संस्था, उद्योग, बिगर-सरकारी संस्था, अथवा पाणी वापरकर्ती संघटना, ज्यांनी जल-संवर्धन आणि जल-व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय काम केले आहे, ते अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक:
पुढील श्रेणी मध्ये- ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ आणि ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’, विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. उर्वरित श्रेणी मध्ये- ‘सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत’, ‘सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट माध्यम’, ‘सर्वोत्कृष्ट शाळा’, ‘सर्वोत्कृष्ट संस्था- आवाराचा वापर करण्यासाठी’, ‘सर्वोत्कृष्ट उद्योग’, ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था (एनजीओ)’, ‘सर्वोत्कृष्ट पाणी वापर कर्ती संघटना’ आणि ‘सर्वोत्कृष्ट उद्योग- सीएसआर उपक्रम राबवण्यासाठी’, विजेत्यांना पारितोषिकाची रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे रु.2 लाख, रु.1.5 लाख आणि रु.1 लाख असे रोख रकमेचे बक्षीस आहे.
निवड प्रक्रिया:
4 थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीसमोर ठेवले जातील. निवड समितीच्या शिफारशीशिवाय कोणताही पुरस्कार दिला जात नाही. निवड समितीची शिफारस केंद्रीय मंत्री (जल शक्ती) यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली जाते. त्यानंतर, योग्य तारखेला विजेत्यांची नावे जाहीर केली जातात.
Sl.
No.
|
Name of category
|
Eligible Entity
|
Award
|
No. of Award
|
1.
|
Best State
|
State Government/UT
|
Trophy with Citation
|
3Awards
|
2.
|
Best District
|
District Administration/ DM/ DC
|
Trophy with Citation
|
3 Awards
|
3.
|
Best Village Panchayat
|
Village Panchayat
|
Cash Awards
& Trophy with Citation
|
3 Awards:
First award:
Rs.2 lakh
Second award: Rs.1.5lakh
Third award: Rs.1lakh
|
4.
|
Best Urban Local Body
|
Urban Local Body
|
-do-
|
-do-
|
5.
|
Best Media (Print & Electronic)
|
Newspaper/Magazine/ TV Shows
|
-do-
|
-do-
|
6.
|
Best School
|
School
|
-do-
|
-do-
|
7.
|
Best Institution for Campus usage
|
Institution/ RWA/ Religious/ Higher Education organization
|
-do-
|
-do-
|
8.
|
Best Industry
|
Small/Medium/ Large Scale Industry
|
-do-
|
-do-
|
9.
|
Best NGO
|
Registered NGOs
|
-do-
|
-do-
|
10.
|
Best Water User Association
|
Water User Association
|
-do-
|
-do-
|
11.
|
Best Industry for CSR Activities
|
Large/ Medium/Small Industry
|
-do-
|
-do-
|
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1848711)
Visitor Counter : 307