गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बंगळुरू येथे तिसऱ्या 'संकल्प से सिद्धी' परिषदेला संबोधित केले

Posted On: 04 AUG 2022 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनी आज बंगळुरू येथे तिसऱ्या 'संकल्प से सिद्धी' परिषदेला संबोधित केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री  बसवराज बोम्मई आणि केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र  सरकारने स्वातंत्र्याच्या 75  वर्षांच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अमृतमहोत्सवादरम्यान, पुढील 25 वर्षानंतर , आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाच्या वेळी भारत जगात कुठे असेल , कशा प्रकरे  जगाचे नेतृत्व करेल हे जनतेने ठरवायला हवे.  संकल्प ते सिद्धी ही परिषद 'अमृतवर्ष' ते शतक महोत्सवी वर्षाचे नियोजन करण्याचे संमेलन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 ते 100 वर्षांदरम्यानच्या कालावधीचे वर्णन अमृतकाल असे केले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर 17 लोकसभा निवडणुका झाल्या, 22 सरकारे निवडून आली आणि  15 पंतप्रधान झालेले आपण पाहिले  आणि या सर्वांनी देशाच्या प्रगतीत योगदान दिले. मात्र  गेल्या 8 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकास जगासमोर ठेवला आहे. आज भारत ज्या वेगाने विविध आयामांमध्ये विकसित होत आहे ते जग पाहत आहे. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे सुधारणा झाली नाही, जिथे आपण प्रगती केली नाही आणि जिथे काहीही अशक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाज कल्याणातून भारत घडवण्याचा निर्धार आहे, यातून  लोकसहभाग उभारण्याची  त्यांची प्रबळ इच्छा दिसून येते.

जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून  यावर्षी एप्रिलमध्ये 1.68 लाख कोटी रुपये इतका विक्रमी जीएसटी  महसूल संकलित झाला आहे. 2022 मध्ये सर्वाधिक व्यापारी वस्तूंची निर्यात झाली, 2022 मध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आणि व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीतही आपण मोठी झेप घेतली आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन घोषणा देत सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा दिली आहे. मोदी सरकारने अमृतकालचा पुढील 25 वर्षांचा पाया रचला आहे आणि आज कोणीही भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

शाह म्हणाले, 2019 मध्ये, देशाने कोविड-19 च्या रूपाने  सर्वात मोठ्या महामारीचा सामना केला, या परिस्थितीत भारताने स्वतःला एक नवीन मॉडेल म्हणून स्थापित केले आणि नवीन धोरण अवलंबले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयांमुळे, जगभरातील अर्थतज्ज्ञ म्हणू लागले की कोविड-19 च्या प्रभावातून सावरणारी  भारताची अर्थव्यवस्था ही पहिली अर्थव्यवस्था आहे.

या काळात  अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा,व्यवस्थेत  पद्धतशीर सुधारणा, लोकसंख्याशास्त्र  आणि मागणी आणि पुरवठा  या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले , आणि या पाच स्तंभांच्या आधारे आपण कोविड-19 चा सामना करण्याचे  ठरवले आणि  मोदींच्या या धोरणांमुळे भारताला कोविड-19 संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली.

कोविड-19 च्या काळात  नवीन शैक्षणिक धोरण, ड्रोन धोरण, आरोग्य धोरण तयार करण्यात आले. व्यावसायिक कोळसा खाणकामासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आणि त्याचवेळी इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणाचा मसुदाही तयार करण्यात आला, असे अमित शाह यांनी सांगितले. 14 क्षेत्रांमध्ये 30 लाख कोटी रुपयांचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने, आम्ही उत्पादन  संलग्न प्रोत्साहन योजना आणली. नरेंद्र मोदी  भारताला आत्मनिर्भर  आणि उत्पादन केंद्र बनवण्यासाठी कार्यरत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा  विकास दर  7.4 टक्के आहे, जो अनेक विकसित देशांपेक्षा खूप अधिक आहे,यावरून असे दिसून येते  की,आपली धोरणे यशस्वी झाली असून  परिणाम दर्शवत आहेत, असे ते म्हणाले.

2014 ते 2021 दरम्यान भारतात  440 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी थेट परदेशी गुंतवणूक  आली आणि आपण  गुंतवणुकीसाठी जगातील 7 वे पसंतीचे  ठिकाण बनलो आहोत.सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही 100 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे निश्चित केले आहे , 11 औद्योगिक मार्गिका बांधल्या आहेत  आणि 32 आर्थिक गुंतवणूक क्षेत्रे तयार केल्याचेकेंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

देशाच्या मोठ्या लोकसंख्येचे महत्त्व अधोरेखित करत अमित शाह  म्हणाले की, मोठी लोकसंख्या ही एक बाजारपेठ आहे आणि देशाचा विकास प्रमाणबद्ध असेल तेव्हा बाजारपेठ विकसित होते. भारताची लोकसंख्या 130 कोटी असताना  बाजारपेठ 80 कोटी लोकांची होती, कारण बाकीच्या लोकांकडे विकत घेण्याची क्षमता नव्हती, गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी यांनी या सर्व लोकांना देशाच्या विकासाशी जोडले आहे, मोदी यांनी  अर्थव्यवस्था आणि जीडीपीला मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे.

सीआयआय हे संशोधन आणि विकासाला  प्रोत्साहन देणारे व्यासपीठ असावे . भारतातील उद्योग जगताने  आपला वेग वाढवण्याचा विचार न करता त्याची  श्रेणी  बदलण्याचा विचार केला पाहिजे आणि जर  श्रेणी बदलायची  असेल तर संशोधन आणि विकासावर  जोर द्यावा लागेल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

संशोधन आणि विकासासाठी असलेले सर्वोत्तम ज्ञान  भारतातील तरुणांकडे आहे, असे  मानले जाते आणि  त्यांनी भारतात संशोधन आणि विकास करावा यासाठी सीआयआयने   करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतअसे ते म्हणाले. उद्योग आणि स्टार्टअप यांच्यात एक प्रकारचा संबंध आहे त्यामुळे उद्योगांनीही स्टार्टअपला पाठबळ दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.  कच्च्या मालापासून ते तयार मालापर्यंत उत्पादन साखळीतील काहीही भारताबाहेर बनवू नये . सीआयआयने गोष्टी ओळखल्या पाहिजेत.तसेच समस्या सोडवण्यासाठी काही ठोस प्रस्ताव सीआयआयने आणले पाहिजेत, असे त्यांनी सीआयआयला सुचवले. संरक्षण, ऊर्जा आणि किफायतशीर उद्योग आणि उत्पादन केंद्र कशी  उभारता  येतील  यावर विशेष लक्ष देऊन पुढे जाण्याची गरज शाह यांनी व्यक्त केली.  उद्योग जगतानेही 130 कोटी लोकांशी, त्यांच्या हितसंबंधांशी, सुख-दु:खांशी जोडले गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी सीआयआयला केले.

 

  

 

 

 

 

S.Patil/Sushma/Sonal C/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 1848556) Visitor Counter : 285