पंतप्रधान कार्यालय
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2022 9:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत (2022) बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
एकापाठोपाठ एक जारी केलेल्या ट्विट संदेशांत त्यांनी म्हटले आहे की, बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकूल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या किदांबी श्रीकांत @srikidambi, सात्विक साईराज @satwiksairaj, बी सुमित रेड्डी @buss_reddy, लक्ष्य सेन @lakshya_sen, चिराग शेट्टी @Shettychirag04, त्रिसा जॉली, आकर्षी कश्यप, पी अश्विनी@P9Ashwini, गायत्री गोपीचंद आणि पी व्ही सिंधू @Pvsindhu1 यांच्या संघाचे अभिनंदन. त्यांच्या या यशाबद्दल मला अभिमान आहे.
भारतात बॅडमिंटन हा सर्वाधिक प्रशंसापात्र खेळ आहे. बॅडमिंटन खेळ आता आणखीही कितीतरी पुढे नेण्यात राष्ट्रकूलमधील रौप्यपदक खूप मोठी भूमिका बजावणार आहे आणि अधिकाधिक लोक येत्या काळात या खेळाकडे वळतील, याची सुनिश्चिती झाली आहे.
***
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1847710)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam