दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या दूरसंचार क्षेत्र सुधारणांना दूरसंचार उद्योगांचा सकारात्मक प्रतिसाद: 5G स्पेक्ट्रम लिलावांची एकूण रक्कम 1,50,173 कोटी रुपये

Posted On: 02 AUG 2022 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

भारत सरकारणे, 72,098 मेगाहर्ट्झ चे स्पेक्ट्रम लिलावासाठी खुले केले होते, त्यापैकी, 51,236 मेगाहर्ट्झ (एकूण MHz चे 71%) ची विक्री झाली असून, या विक्रीची एकूण किंमत 1,50,173 कोटी रूपये इतकी आहे.

आतापर्यंत पूर्ण  झालेल्या लिलावात एमएम व्हेव बॅन्ड (26 गिगाहर्ट्झ) मधील 400 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मेसर्स अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेडने मिळवले आहेत. तर, मेसर्स भारती एअरटेल ने 900, 1800, 2100, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्ट्झ बॅन्डमधील 19,867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळवले आहेत. मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडनं 700, 800, 1800, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्ट्झ बॅन्डमधील 24,740 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम प्राप्त केले आहेत. मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं 1800, 2100, 2500, 3300 MHz आणि 26 गिगाहर्ट्झ बॅन्डमधील 6,228 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळवले आहेत.

एकूण 1,50,173 रकमेच्या लिलावात, 212 कोटी रुपयांची बोली , अदानी डेटा नेटवर्क्सची तर 43,048 कोटी रुपयांची बोली भारती एअरटेलची  आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं 88,078 कोटी रुपयांची बोली लावली आहे. तर 18,799 कोटी रुपयांची बोली व्होडाफोन आयडियानं जिंकली आहे. या सर्व सहभागी कंपन्या 13,365 कोटी रुपयांचा वार्षिक हप्ता भरणार आहेत.

वार्षिक हप्त्यावर 7.2% इतका व्याजदर लावला जाणार आहे.  काही कंपन्या अधिक शुल्क आगावू भरू शकणार आहेत.

600 मेगाहर्ट्झचे बॅन्ड लिलावासाठी यावेळी पहिल्यांदाच ठेवण्यात आले होते मात्र त्यासाठी एकही बोली आली नाही . 600 मेगाहर्ट्झचे हे बॅन्ड अद्याप मोबाईल टेलिफोन जाळ्यासाठी विकसित करण्यात आले नाहीत. येत्या काही वर्षांत हे बॅन्ड अधिक महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

700 मेगाहर्ट्झसाठीची, 5G ची परीसंस्त्था अतिशय उत्तम प्रकारे विकसित करण्यात आली आहे. त्याचा सेल साईझ अतिशय मोठा असून, त्यासाठी फार मोठ्या पायाभूत सुविधांची देखील गरज नाही. हा ब्रॅंडमध्ये  मोठी रेंज आणि उत्तम कव्हरेज मिळणार आहे. मेसर्स रिलायन्स जिओला या साठी  संपूर्ण देशभरात 10 MHz चे स्पेक्ट्रम मिळाले आहेत.

तर, 800 ते 2500 मेगाहर्ट्झ या  दरम्यानच्या बॅन्डसाठी सहभागी कंपन्यांनी क्षमता विकसित करण्यासाठी आणि 4G स्पेक्ट्रममध्ये सुधारणा करण्यासाठी बोली लावली होती.

मिड बॅन्ड म्हणजेच,  3300 मेगाहर्ट्झचे बॅन्ड उच्च दर्जाच्या वेगवान संपर्कासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या क्षेत्रात सध्या असलेल्या तिन्ही कंपन्यांनी या क्षेत्रात स्पेक्ट्रम घेतले आहेत. यातून दूरसंचार कंपन्या, सध्याची 4G क्षमता एकत्रित करुन, त्याद्वारे 3300 मेगाहर्ट्झची 5G सेवा देणार आहेत.

मिमी वेव्ह बँडमध्ये म्हणजेच 26 GHz मध्ये उच्च दर्जाची वेगवान संपर्क(डेटा देवाणघेवाण) क्षमता आहे.मात्र, त्याची व्याप्ती खूप कमी आहे. हा बँड कॅप्टिव्ह किंवा सार्वजनिक नसलेल्या (खाजगी) नेटवर्कसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस (FWA) या बँडमध्ये जगभरात लोकप्रिय होत आहे. FWA चा वापर उच्च घनता / गर्दीच्या शहरी भागात फायबरला पर्याय म्हणून केला जाऊ शकतो. चारही सहभागी कंपन्यांनी या बँडमध्ये स्पेक्ट्रम प्राप्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि स्पष्ट धोरणांमुळे हा  स्पेक्ट्रम लिलाव यशस्वी झाला आहे. दूरसंचार क्षेत्र विकासाच्या मार्गावर असल्याचेही यातून दिसून येते.

स्पेक्ट्रम वाटपाची संपूर्ण  प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण केली जाईल आणि सप्टेंबर/ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी विकत घेतलेल्या स्पेक्ट्रमचे प्रमाण आणि देय रकमेचे बोलीदारानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेत:

Quantum

Operator

700 MHz

800 MHz

900 MHz

1800 MHz

2100 MHz

2500 MHz

3300 MHz

26 GHz

Total

Total Spectrum put to auction

550

136

74

267

160

230

7,260

62,700

72,098

M/s Adani data Networks Limited

0

0

0

0

0

0

0

400

400

Bharti Airtel limited

0

0

12.8

25

30

0

2,200

17,600

19,867.8

Reliance Jio Infocomm Limited

220

20

0

60

0

0

2,440

22,000

24,740

Vodafone Idea Limited

0

0

0

3.4

5

20

850

5,350

6,228.4

Total

220

20

12.8

88.4

35

20

5490

45,350

51,236.2

% Spectrum bid for

40%

15%

17%

33%

22%

9%

76%

72%

71%

 

The bid amounts payable (Rs. Cr) :

Operator

700 MHz

800 MHz

900 MHz

1800 MHz

2100 MHz

2500 MHz

3300 MHz

26 GHz

Total

M/s Adani data Networks Limited

0

0

0

0

0

0

0

212

212

Bharti Airtel limited

0

0

349

2,763

2,680

0

31,700

5,592

43,084

Reliance Jio Infocomm Limited

39,270

1050

0

7,028

0

0

33,740

6,990

88,078

Vodafone Idea Limited

0

0

0

584

500

650

15,150

1,915

18,799

Total

39,270

1050

349

10,375

3,180

650

80,590

14,709

1,50,173

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847426) Visitor Counter : 282