Posted On:
02 AUG 2022 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
देशवासीयांनी आपल्या समाजमाध्यमावरील खात्यांचा डीपी बदलून त्याजागी तिरंगा ठेवावा असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून अमित शाह यांनी सांगितले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी मी माझ्या सर्व समाजमाध्यमावरील खात्यांच्या प्रोफाइल छायाचित्रावर तिरंगा ठेवला आहे."
अमित शाह म्हणाले की, "राष्ट्रध्वजाबद्दल तुमचे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की, तुमच्या समाजमाध्यमावरील खात्यांचा डीपी बदलून तिरंगा ठेवा."
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com