पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अचिंता शेउली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2022 9:00AM by PIB Mumbai

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक अचिंता शेउली याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी  भारतीय चमू रवाना होण्यापूर्वी  अलीकडेच  अचिंता शिउली याच्याशी साधलेला  संवाद देखील मोदी यांनी सामायिक केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

''राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये  प्रतिभावान अचिंता शिऊलीने सुवर्णपदक जिंकले याबद्दल आनंद झाला. तो त्याच्या शांत स्वभावासाठी आणि चिकाटीसाठी ओळखला जातो. या विशेष कामगिरीसाठी त्याने  खूप मेहनत घेतली आहे.त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा.''


" आपला चमू  राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी मी अचिंता शेउली याच्याशी  संवाद साधला होता.त्याला त्याच्या आई आणि भावाकडून मिळालेल्या पाठिंब्याविषयी  आम्ही चर्चा केली होती.मला आशा आहे की , त्याने आता पदक जिंकले आहे, त्याला आता चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळेल''  

***

Jaydevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846878) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Kannada , Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam