युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्कृष्ट खेळाडू आणि साई, राष्ट्रीय क्रीडा उत्कृष्टता प्रशिक्षणार्थी बिंदयारानी हिची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी

Posted On: 31 JUL 2022 8:05PM by PIB Mumbai

 

भारोत्तोलक बिंदयारानी देवी हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 55 ​​किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तिने एकूण 202‌ किलो (86किलो +116किलो) वजन उचलले.

मणिपूरच्या बिंदयारानी देवी हिने एक दशकापूर्वी तिच्या मूळ गावी इम्फाळमध्ये वेटलिफ्टिंगला सुरुवात केली होती. या खेळाला सुरुवात केल्यापासून केवळ 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत तिची इंफाळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) राष्ट्रीय क्रीडा उत्कृष्टता केंद्रात (नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स) प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

इंफाळ येथील राष्ट्रीय क्रीडा उत्कृष्टता केंद्रातील  3 वर्षांच्या सतत प्रशिक्षण आणि कठोर परिश्रमानंतर तिची 2019 साली साईच्या पटियाला प्रादेशिक केंद्रात भारतातील राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली.

गेल्या काही वर्षांमध्ये तिने कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्णपदक, 2021 मध्ये याच स्पर्धेत रौप्य पदक यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत, परंतु 30 जुलैच्या रात्री तिने जिंकलेले रौप्य पदक ही तिची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी आहे, ज्यात तिने  बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 55 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविले.

आपले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उत्तमप्रकारे सज्ज  आहेत याची खात्री करण्यासाठी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग ॲन्ड कॉम्पिटीशन्स या  योजनेअंतर्गत एकूण 25,63,336 रुपये निधी दिला.या योजनेद्वारे इतर भारोत्तोलकांसह बिंदयाराणीला कार्यक्रमाच्या एक महिना अगोदर बर्मिंगहॅमला पाठवले जेणेकरून ती मोठ्या स्पर्धेपूर्वी  वातावरणाशी परिचित होईल. बिंदयाराणी ही टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमच्या डेव्हलपमेंट ग्रुपचा देखील एक भाग आहे, ज्यामुळे तिला तिच्या प्रशिक्षणासाठी 25,000 रुपये मासिक भत्ता मिळतो.

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846800) Visitor Counter : 195