आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 203 कोटी 94 लाख (203.94 कोटी) पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 89 (3.89 कोटी) लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविडबाधित उपचाराधीन रुग्णसंख्या 1,43,384

गेल्या 24 तासांत देशात 20,408 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.48%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.92% आहे

Posted On: 30 JUL 2022 9:18AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 203.94 कोटींचा (2,03,94,33,480) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,69,93,794 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 89 लाखांहून अधिक (3,89,53,795) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,11,639

2nd Dose

1,00,89,866

Precaution Dose

62,98,690

FLWs

1st Dose

1,84,30,481

2nd Dose

1,76,70,630

Precaution Dose

1,21,62,493

Age Group 12-14 years

1st Dose

3,89,53,795

2nd Dose

2,78,17,060

Age Group 15-18 years

1st Dose

6,11,66,990

2nd Dose

5,10,10,209

Age Group 18-44 years

1st Dose

55,94,97,234

2nd Dose

50,86,57,147

Precaution Dose

2,18,22,193

Age Group 45-59 years

1st Dose

20,36,82,402

2nd Dose

19,52,47,426

Precaution Dose

1,48,07,569

Over 60 years

1st Dose

12,74,37,886

2nd Dose

12,20,14,993

Precaution Dose

3,22,54,777

Precaution Dose

8,73,45,722

Total

2,03,94,33,480

भारतातील कोविडबाधित उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 1,43,384 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.33% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.48% झाला आहे. गेल्या 24 तासांत 20,958 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,33,30,442 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 20,408 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,04,399 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 48 लाखांहून अधिक (87,48,11,197) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.92% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5.05% इतका नोंदला गेला आहे.

***

ShaleshP/VY/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846450) Visitor Counter : 104