राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मोझांबिकमधील संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2022 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

मोझांबिक विधानसभेच्या अध्यक्षा एस्पेरांका लॉरिंडा फ्रान्सिस्को निहुआने बायस यांच्या नेतृत्वाखाली मोझांबिकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (29 जुलै 2022) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाले की त्यांनी 25 जुलै 2022 रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिले आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ म्हणून राष्ट्रपती भवनात त्यांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे. भारत आणि मोझांबिक यांच्यात उच्चस्तरीय नियमित देवाणघेवाण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटींमुळे दोन्ही देशांत घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

मोझांबिक हा भारताचा राजनैतिक भागीदार आणि जवळचा मित्र आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.  भारतीय कंपन्यांनी मोझांबिकच्या नैसर्गिक वायू आणि खाण क्षेत्रात सुमारे 10 अब्ज  डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारत सरकारने मोझांबिकमधील विविध प्रकल्पांसाठी कर्ज देखील दिले आहे. मोझांबिकमधील भारतीय समुदाय मोझांबिकच्या आर्थिक विकासात योगदान देत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846350) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil