मंत्रिमंडळ
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था आणि ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
27 JUL 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (एनआयआरडीपीआर) आणि इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग (UoR) यांच्यात विकसनशील देशांमधील कृषी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. या सामंजस्य करारावर मार्च 2022 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आहे.
परिणाम:
हा सामंजस्य करार राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था अधिकाऱ्यांना ज्ञान प्राप्त करण्यास आणि वाढविण्यात मदत करेल आणि कृषी, पोषण आणि ग्रामीण विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेटवर्क विकसित करेल.
दोन्ही संस्था एकत्रितपणे कृषी अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, उपजीविका आणि पोषण अभ्यासात मोठ्या प्रमाणात संशोधन कौशल्य आणू शकतात जे संशोधन आणि क्षमता बांधणीच्या उदयोन्मुख आंतर-विषय क्षेत्रासाठी आवश्यक आहे.
पार्श्वभूमी:
ऊर्जा खर्चाचे गणित मांडून पोषण मूल्यमापन सुधारणे, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कृषी उपजीविका संशोधनामध्ये वेअरेबल एक्सेलेरोमेट्रिक आणि सेन्सर आधारित उपकरणांचा वापर आणि महिला आणि बाल विकास क्षेत्र यासारख्या ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील विविध संशोधन उपक्रमांमध्ये एनआयआरडीपीआर ही युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग सोबत काम करत आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845562)
Visitor Counter : 185
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam