पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारताने देशातील रामसर स्थळांच्या संख्येत 5 नवीन स्थानाचा केला समावेश
Posted On:
26 JUL 2022 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2022
भारताने देशातील रामसर स्थळांच्या संख्येत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश केला आहे. यात तामिळनाडूमधील तीन पाणथळ प्रदेश (कारीकिली पक्षी अभयारण्य, पल्लिकरणाई पाणथळ राखीव अभयारण्य आणि पिचावरम कांदळवन), मिझोराममधील एक स्थान (पाला पाणथळ प्रदेश) आणि मध्यमधील एक पाणथळ स्थान (सख्य सागर) यांचा समावेश आहे. देशात यामुळे एकूण 54 रामसर स्थळे झाली आहेत. रामसर स्थळांची संख्या 49 वरून 54 इतकी वाढवण्यात आली आहे.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844932)
Visitor Counter : 389