गृह मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत घरोघरी तिरंगा फडकावून सहभागी होण्याचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे देशवासीयांना आवाहन


आपला राष्ट्रध्वज प्रत्येक भारतीयाला केवळ एकत्रच आणत नाही तर राष्ट्रभक्तीची भावना देखील मजबूत करतो

Posted On: 22 JUL 2022 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ  केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत घरोघरी तिरंगा फडकावून सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी  देशवासीयांना केले आहे.

अनेक ट्वीटसच्या  मालिकेत अमित शाह म्हणाले : आपला राष्ट्रीय ध्वज प्रत्येक भारतीयाला केवळ एकत्रच आणत नाही तर राष्ट्रभक्तीची भावना देखील मजबूत करतो. 22 जुलै 1947 रोजी सध्याच्या स्वरूपातील तिरंगाराष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याची घोषणा झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ केला होता. या अभियानाअंतर्गत 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, त्यायोगे  नागरिकांमध्ये आणि प्रामुख्याने युवा वर्गात राष्ट्रभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे कार्य होईल.

13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन मी करतो. जेणेकरून आपण युवकांमध्ये राष्ट्रध्वजाप्रती असलेला आदर आणि ऋणानुबंध द्विगुणीत करू शकू, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाची जाणीव करून देऊ, असे अमित शाह म्हणाले. https://harghartiranga.com

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844036) Visitor Counter : 170