निती आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय नवोन्मेष निर्देशांकाची तिसरी आवृत्ती नीती आयोग करणार प्रसिद्ध

Posted On: 20 JUL 2022 9:10AM by PIB Mumbai

नीती आयोग 21 जुलै 2022 रोजी नीती भवनातील एका कार्यक्रमात भारतीय नवोन्मेष निर्देशांकाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध करणार आहे. भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 चे प्रकाशन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी   नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
 

हे निर्देशांकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन आहे – पहिली आणि दुसरी आवृत्ती अनुक्रमे ऑक्टोबर, 2019 आणि जानेवारी, 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती – राष्ट्राला नवोन्मेषी अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचाच ही उद्घोष करते.
 

महामारीने जागतिक लोकसंख्याशास्त्रीय समतोलावर तीव्र प्रतिकूल परिणाम केला. त्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 तयार केला आहे. लवचिकता आणि संकटावर तोडगा शोधणाऱ्या नवोन्मेषाने या कसोटीच्या काळात भारताला सावरत उभारी घेण्यात मदत केली आहे. भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 निम-राष्ट्रीय स्तरावर नवोन्मेषी क्षमता आणि परिसंस्थेचे परीक्षण करतो, अशा संकटांवर तोडगा शोधणाऱ्या नवकल्पनांना प्रोत्साहन देतो.  अलीकडील घटक आणि उत्प्रेरकांवर प्रकाश टाकतो.
नीती आयोगाने, भारतीय नवोन्मेष निर्देशांकासह, देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नाविन्यपूर्ण परिसंस्थेची क्रमवारी निश्चित करण्यासाठी एक सुसंगत साधन पद्धती विकसित करण्याचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा होईल आणि त्याद्वारे स्पर्धात्मक संघीयवाद वाढीस लागेल.

 

हा कार्यक्रम इथेही थेट प्रक्षेपित केला जाईल: https://youtu.be/h9Esk5EFpP4

***

SamarjeetT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842950) Visitor Counter : 351