रसायन आणि खते मंत्रालय
भारत सरकार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच समूहांवर लक्ष केंद्रित करून औषधनिर्मिती उद्योगाला मजबूती प्रदान करण्यासाठी आणणार योजना
Posted On:
19 JUL 2022 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2022
औषधनिर्मिती उद्योगामधील भारताचे विद्यमान उत्पादन कौशल्य अधिक वाढवण्याच्या उद्देशाने, औषधनिर्माण विभाग आणि रसायने आणि खते मंत्रालय, 'औषधनिर्मिती उद्योगाचे सशक्तिकरण' (एसपीआय) या योजने अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्याची भारत सरकार योजना आखत आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची धोरणात्मक भूमिका लक्षात घेऊन, जे उद्योगांना महत्त्वाचे असे ग्राहकांशी जोडणारे फॉरवर्ड लिंकेज आणि पुरवठादारांशी जोडणारे बॅकवर्ड लिंकेज प्रदान करतात तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची समूहात वाढ होते हे लक्षात घेऊन, या योजना एकक स्तर आणि समूह स्तरावर तंत्रज्ञान सुधारणा करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करतील.
या उपक्रमांचे औपचारिक अनावरण केंद्रीय रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते 21 जुलै 2022 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहात होणार आहे. रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रसायने आणि खते विभाग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सिडबी, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग, उद्योजक आणि स्टार्ट अपचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील.
S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842761)
Visitor Counter : 178