पंतप्रधान कार्यालय

रामपूर रस्ते अपघातात झालेल्या मृत्युंबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 17 JUL 2022 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपूर येथे झालेल्या रस्ते अपघातातील मृत्युंबाबत तीव्र शोक व्यक्त केला.  मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले.  राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात केलेले  ट्विट:

"उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झालेला रस्ते अपघात ही अतिशय दुःखद घटना आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करून, जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करत आहे '': पंतप्रधान मोदी

 

 

* * *

Jaydevi PS/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842177) Visitor Counter : 141