सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'आझादी का अमृत महोत्सव- 22 वा भारत रंग महोत्सव 2022' चे उद्घाटन केले
राष्ट्रीय नाट्य संस्थेने अज्ञात स्वातंत्र्य नायकांशी संबंधित घटनांवर आधारित नाटके तयार करावीत आणि त्यांच्या शौर्य आणि शौर्याच्या कथा देशातील नागरिकांसमोर आणाव्यात: अर्जुन राम मेघवाल
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2022 12:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्रालय 'आझादी का अमृत महोत्सव' अर्थात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य संस्था (NSD) या संस्थेने “आझादी का अमृत महोत्सव - 22 वा भारत रंग महोत्सव, (आझादी खंड)” हा उत्सव, देशातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, 16 जुलै ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित केला आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन संसदीय कार्य आणि सांस्कृतिक व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध लोकसंगीत गायिका पद्मश्री मालिनी अवस्थी, सांस्कृतिक मंत्रालयाचे संचालक अरविंद कुमार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

याप्रसंगी संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातील असे अनेक अज्ञात सैनिक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, तरीही ते आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा भाग बनू शकले नाहीत. उदाहरण देताना त्यांनी नमूद केले की, सन 1913 मध्ये मानगढ मधील आदिवासींवर क्रूरपणे अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आले होते, परंतु या घटनेची इतिहास नोंद नाही. अशा घटना आणि वीरांची माहिती भारतीयांना व्हावी तसेच त्यांचे शौर्य आणि शौर्यगाथा जगासमोर याव्यात ,यावर आधारित नाटके तयार करण्यासाठी रंगमंच कार्यकर्ते आणि राष्ट्रीय नाट्य संस्था यांनी पुढे यावे आणि देशभरात यांचे नाट्य रुपांतरण सादर केले जावे, असेही ते म्हणाले.

मालिनी अवस्थी यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तुतीसाठी देशाच्या विविध भागात गायल्या जाणाऱ्या विविध लोकगीतांचा उल्लेख केला. अशा अनेक गाण्यांवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, परंतु लोककलाकारांनी अशी गाणी गाणे चालू ठेवले आणि अशा प्रकारे अज्ञात नायकांच्या कथा पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्या. राष्ट्रीय नाट्य संस्थेचे संचालक प्रा.डॉ. रमेश चंद्र गौर हे महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी होते.

उद्घाटन समारंभानंतर बन्सी कौल दिग्दर्शित “अरण्याधिपती तंट्या मामा” या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
* * *
Jaydevi PS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842148)
आगंतुक पटल : 264