सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या कृषी आणि ग्रामीण विकास बँक (ARDBs) - 2022 च्या राष्ट्रीय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2022 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
राष्ट्रीय सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक फेडरेशन लिमिटेडने (NAFCARD) उद्या नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय सहकार संघाच्या सभागृहात, 'कृषी आणि ग्रामीण विकास बँक (ARDBs) - 2022' राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित गाव पातळीवरील जनसंपर्क कार्यक्रमासह कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या क्षेत्रीय कार्यक्रमांचा समारोप होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला योग्य चालना देण्याच्या उद्देशाने जुलै 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली होती. अमित शहा यांच्याकडे या नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.
सहकार क्षेत्रात देशातील शेतकरी, कृषी आणि ग्रामीण भागाच्या विकास आणि सक्षमीकरणाची असीम क्षमता आहे. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार 'सहकार से समृद्धी' या मंत्राला अनुसरून सहकार क्षेत्राला सक्षम बनवत आहे.
2020-21 या कालावधीत कर्ज, वसुली आणि कामगिरीच्या इतर मापदंडांनुसार उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केरळ, कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकांचा (SCARDB) सत्कार करण्यासाठी फेडरेशनने एक पुरस्कार सोहळाही आयोजित केला आहे. ग्रामीण क्षेत्रात 90 वर्षांहून अधिक काळ अविरत सेवा देणाऱ्या देशातील चार जुन्या कृषी आणि ग्रामीण विकास बँकानांही यावेळी पुरस्कार प्रदान केले जातील.
मुंबईतील राष्ट्रीय सहकारी कृषी आणि बँक फेडरेशन ही देशातील राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकांची सर्वोच्च संस्था आहे.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1841761)
आगंतुक पटल : 208