ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने(सीपीसीए) ई कॉमर्स मंचांसाठी आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधे विक्रीसंदर्भात जारी केली मार्गदर्शक सूचना


अशी औषधे नोंदणीकृत आयुर्वेदिक, सिद्ध किंवा युनानी डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरचरच विकण्याचा सल्ला

Posted On: 14 JUL 2022 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ई कॉमर्स व्यापाऱ्यांसाठी अधिसूची ई(1) मध्ये समाविष्ट असलेल्या औषधे आणि सौंदर्यप्रसाधन नियम, 1945 अनुसार अंतर्गत घटकांचा समावेश असलेली आयुर्वेदिक, सिद्ध किंवा युनानी औषधे विक्रीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ई कॉमर्स मंचांना अशा  औषधांच्या विक्रीसंदर्भात वापरकर्त्यांनी आपल्या मंचावर नोंदणी केलेल्या या औषधांबाबत नोंदणीकृत आयुर्वेदिक, सिद्ध किंवा युनानी डॉक्टरने वैध प्रिस्क्रिप्शन  लिहून दिल्यावरच विक्री केली जावी, असे त्यात म्हटले आहे. वैद्यकीय देखरेखीशिवाय अशा औषधांचे सेवन केल्यामुळे गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असे त्यात म्हटले आहे.

औषधे आणि सौदर्यप्रसाधन नियमावली, 1945 च्या 161 (2) नियमानुसार, मानवी आजारांसाठी उपचारांकरता वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या डब्यावर अनुसूची ई(1)  द्वारा विनिर्दिष्ट केलेल्या घटकद्रव्याने ती बनलेली असतील तर त्याच्या लेबलवर कॉशनः टुबी टेकन अंडर मेडिकल सुपरव्हिजन म्हणजे सावधानः वैदयकीय देखरेखीखाली घेणे अनिवार्य असे हिंदी आणि इंग्रजीत छापलेले असणे आवश्यक आहे.

आयुष मंत्रालयाने 1 फेब्रुवारी  2016 रोजी एक सार्वजनिक सूचना जारी करून सर्व हितधारकांना उपरोल्लेखित औषधे ही वैद्यकीय देखरेखीखाली घ्यायची आहेत आणि वैद्यकीच सल्ल्याशिवाय अशा औषधांची ऑनलाईन खरेदी करणे टाळले पाहिजे, असे त्यात म्हटले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

 

 S.Patil/U.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841593) Visitor Counter : 194