कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायतीराज संस्था या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन कल्याणकारी योजनांचे आवश्यक वाहक - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह


मोदी सरकारच्या लोक अणि गरीब कल्याणाच्या योजनांविषयी जनजागृती करत त्या 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे आवाहन

Posted On: 09 JUL 2022 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात पंचायतीराज संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी आवश्यक संदेशवाहक असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.गेल्या आठ वर्षात गरिबांसाठी आणि लोक कल्याणासाठी राबवलेल्या विविध योजना समाजाच्या तळातल्या माणसापर्यंत पोचवण्यात पंचायतीराज संस्था आणि या संस्थांचे प्रतिनिधी महत्वाचा दुवा ठरत आहेत, पंच, सरपंच, तसेच प्रभागांमधून आणि जिल्हा परिषदांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना या सरकारच्या लोक आणि गरीब कल्याणाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे असंही ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशात पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते  बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी सुरवातीपासून पंचायती राज संस्थाना सक्षम करण्याला प्राधान्य दिले आहे, त्याचबरोबर समाजातल्या तळातल्या माणसालाही सक्षम करण्यासाठी या पंचायती राज संस्थाना बळकट केले आहे असे ते म्हणाले.

एप्रिल महिन्यात, पंचायतराज दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी जम्मू जवळच्या पल्ली  पंचायतीची निवड करून तेथून त्यांनी देशातल्या इतर पंचायतराज संस्थाना मार्गदर्शन केले यावरून प्रधानमंत्री पंचायतराज संस्थाना किती महत्व देतात हे सिद्ध होते ,असे त्यांनी सांगितले.देशातील एकही पात्र नागरिक प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री  गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री  किसान योजना, प्रधानमंत्री  किसान निधी, स्वच्छ्ता योजना आदी योजनांच्या लाभापासून वंचीत राहू नये हे सुनिश्चित करणे ही आता पंचायत राज संस्थाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लोकांसाठीच्या अणि गरीब कल्याणाच्या योजनांविषयी जनजागृती करा आणि त्या 100% लाभार्थ्यांपर्यंत  पोहचवा असे आवाहन सिंह यांनी केले.

हे कार्य दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्वज्ञानाशी संलग्न आहे असेही ते यावेळी म्हणाले. कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये याकरिता पंचायत राज संस्थेच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाशी समन्वयाने काम करावे असेही त्यांनी नमूद केले.


* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840405) Visitor Counter : 196