रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतात निर्मित किंवा आयात केलेल्या विविध श्रेणींच्या हलक्या, मध्यम आणि अवजड मोटार वाहनांसाठी इंधन वापर मानकांचे (FCS)अनुपालन समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी
Posted On:
06 JUL 2022 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 G मध्ये सुधारणा करून, 1 जुलै 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये भारतात निर्मित किंवा आयात केलेली विविध श्रेणींमधील हलक्या, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी इंधन वापर मानकांच्या अनुपालनाचा समावेश करण्यात आला आहे. मोटार वाहन उद्योग मानक 149 मध्ये नमूद केलेल्या उत्पादन अनुकूल प्रक्रियेनुसार इंधन वापर मानकांची नियमित अनुपालन पडताळणी केली जाईल.
या अधिसूचनेपूर्वी, वार्षिक इंधन वापर मानकांचे पालन हे 3.5 टन पर्यंत एकूण वाहन वजन वाढीसह M1 श्रेणीच्या (प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मोटार वाहन, ज्यामध्ये चालकाच्या आसन व्यतिरिक्त 8 पेक्षा अधिक सीट नसतील ) मोटार वाहनांपुरते मर्यादित होते. या अधिसूचनेचा उद्देश एफसीएसच्या अनुपालनासाठी वाहनांची कक्षा विस्तारणे आणि अधिक इंधन कार्यक्षम वाहने सादर करणे हे आहे.
ही अधिसूचना लागू होण्याची तारीख 01 एप्रिल 2023 आहे. अधिसूचनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सर्व हितधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Kulkarni /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839592)
Visitor Counter : 193