कोळसा मंत्रालय

कोल इंडियाचा बिगरकार्यकारी कामगारांसाठी लवकरात लवकर वेतन करार पूर्ण करण्याचा उद्देष्य


परस्पर सहमतीचा करार करण्यासाठीच्या वाटाघाटी प्रगतीपथावर

Posted On: 06 JUL 2022 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2022

 

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने, कोल इंडिया लिमिटेडने (सीआयएल) NCWA – XI अंतर्गत आतापर्यंत पाच बैठका घेतल्या असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या बिगर कार्यकारी कामगारांसाठी परस्पर सहमतीने लवकरात लवकर वेतन करार पूर्ण करण्याचा कंपनीचा उद्देष्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील कोळसा क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन, सीआयएलने आपल्या कामगार संघटनांशी सौहार्द्रपूर्ण आणि सलोख्याचे संबंध ठेवले असून कोणतेही मतभेद किंवा संप टाळण्यासाठी प्रयत्न केला जातो.  वाटाघाटी प्रगतीपथावर असून करार पूर्ण होण्य़ासाठी सहसा वेळ लागतोच.     

यासंदर्भात पूर्वीचे तीन वेतन करार यशस्वीपणे करणारी सीआयएल ही पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी होती, याचा उल्लेख करणे समर्पक ठरेल. हीच परंपरा कायम ठेवून, सीआयएलला यावेळीही वेतन करार त्वरित पूर्ण करण्यात यश मिळेल, अशी आशा आहे.

पुढे कंपनीने असेही म्हटले आहे की, वरील निवेदनाच्या विरोधात अशी कोणतीही माहिती तथ्यात्मक दृष्ट्या चुकीची आणि एकतर्फी आहे.

S.Kulkarni /U.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839590) Visitor Counter : 171