माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पत्रकार कल्याण योजनेंतर्गत 7 पत्रकार आणि पत्रकारांच्या 35 कुटुंबांना सरकारच्या वतीने सहाय्य मंजूर
Posted On:
01 JUL 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
जीव गमावलेल्या 35 पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखालील पत्रकार कल्याण योजना समितीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.यात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या 16 कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.
पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या दोन पत्रकारांना तसेच मोठ्या आजारांवर वैद्यकीय उपचारांसाठी पाच पत्रकारांना मदत करण्याची शिफारसही पत्रकार कल्याण योजना समितीने केली आहे.
आतापर्यंत,कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या 123 कुटुंबांना या योजनेअंतर्गत मदत देण्यात आली आहे.सध्याच्या मंजुरीसह चालू बैठकीत एकूण 139 कुटुंबांना मदत देण्यात आली .
गेल्या आर्थिक वर्षात 134 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध श्रेणींमध्ये 6.47 कोटी रुपयांची मदत देण्यात आली.पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय पत्र सूचना कार्यालयाच्या https://accreditation.pib.gov.in/jws/default.aspx या संकेतस्थळावरून पत्रकार कल्याण योजना (जेडब्लूएस) अंतर्गत मदतीसाठी अर्ज करू शकतात.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838671)
Visitor Counter : 196