दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाकडून ग्रामीण डाक सेवकांच्या विविध पदांसाठी निवडलेल्या अंतिम उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणीला 15 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2022 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
अंतिम निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) विविध पदांसाठीच्या कागदपत्रे पडताळणीला टपाल विभागाने 15 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आसाममधील पूरस्थितीमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात विभागाने म्हटले आहे की, आसाममधील पूरस्थिती लक्षात घेऊन,विविध पदांकरता अंतिम निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत 30 जून ऐवजी 15 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
* * *
S.Kane/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1838545)
आगंतुक पटल : 304