वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने सागरी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये 7.76 अब्ज अमेरिकन डॉलर्स असा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे


गोठवलेली कोळंबी (फ्रोझन श्रिम्प) हा सर्वाधिक निर्यात होणारा प्रकार राहीला आहे

अमेरिका , चीन, युरोपियन युनियन , दक्षिण पूर्व आशिया, जपान आणि मध्य पूर्व हे भारताच्या सागरी उप्तादानांचे प्रमुख आयातदार आहेत

Posted On: 29 JUN 2022 3:15PM by PIB Mumbai

कोची, 29 जून: भारताने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा 2021-22 मध्ये 57,586.48 कोटी रुपये मूल्याची 13,69,264 मेट्रिक टन सागरी उत्पादनांची निर्यात केली .
परिमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत गोठवलेली कोळंबी हा  प्रमुख निर्यात प्रकार राहिला  , तर अमेरिका आणि चीन हे भारताच्या सागरी उत्पादनांचे प्रमुख आयातदार आहेत .

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, सागरी उत्पादनांच्या च्या निर्यातीत रुपयाच्या प्रमाणात 31.71% अब्ज तर अमेरिकन डॉलर्स मध्ये 30.26% आणि परिमाणाच्या दृष्टीने 19.12 टक्के इतकी  सुधारणा झाली. 2020-21 मध्ये, भारताने 43,720.98 कोटी रुपये (5,956.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) किमतीचे 11,49,510 मेट्रिक टन सागरी उत्पादन  निर्यात केले होते.

कोविड महामारीमुळे आपल्या प्रमुख निर्यात बाजारपेठेत अनेक आव्हाने असतानाही, भारताने  7.76 अब्ज डॉलर्स किमतीच्या 13,69,264 मेट्रिक टन सागरी  खाद्यपदार्थांची निर्यात केली असून  सर्वकालीन उच्चांकी निर्यात करण्यात यश मिळवले आहे, असे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (एमपीईडीए) अध्यक्ष, के एन राघवन यांनी सांगितले.  भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने दिलेले निर्यात लक्ष्य देखील 99.40% ने पूर्ण केले आहे.

गोठवलेली कोळंबी, ह्या प्रकाराने 42,706.04 कोटी रुपये (5,828.59 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) इतकी कमाई करून  सागरी उत्पादनांच्या  निर्यातीच्या क्षेत्रामधील  सर्वात महत्त्वपूर्ण प्रकार म्हणून त्याचे स्थान कायम ठेवले आहे. कोळंबीचा वाटा एकूण निर्यातीच्या  डॉलर आणि परिमाणाच्या अनुक्रमे 53.18 टक्के आणि 75.11 टक्के आहे. या कालावधीत कोळंबीच्या निर्यातीत अमेरिकन डॉलर्सच्या प्रमाणात  31.68 टक्के आणि परिमाणात 23.35 टक्के वाढ झाली आहे.

2021-22 मध्ये गोठवलेल्या कोळंबीची एकूण निर्यात 7,28,123 मेट्रिक टन  इतकी होती, ज्यातून 5,828.59 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे परकीय चलन मिळाले. गोठवलेल्या कोळंबीची (3,42,572 दशलक्ष) आयात करणारी सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिका  असून, त्यानंतर चीन (1,25,667 दशलक्ष), युरोपियन युनियन (90,549 दशलक्ष), दक्षिण पूर्व आशिया (44,683 दशलक्ष), जपान (38,492 दशलक्ष), आणि मध्य पूर्व (37,158 दशलक्ष) या देशांचा  क्रमांक लागतो. गोठवलेल्या कोळंबीच्या निर्यातीने सर्व बाजारपेठेत मूल्यानुसार वाढ दर्शवली आहे.

व्हन्नामी (व्हाइट लेग ) कोळंबीची निर्यात 2021-22 मध्ये 5,15,907 दशलक्ष वरून 6,43,037 दशलक्ष पर्यंत वाढली आहे. अमेरिकन डॉलर्सच्या  मूल्याच्या दृष्टीने एकूण व्हन्नामी कोळंबीच्या निर्यातीपैकी अमेरिकेचा  वाटा 59.05% आहे, त्यानंतर चीन (14.59%), युरोपियन युनियन (8.16 %), दक्षिण पूर्व आशिया (4.78 %), जपान (3.61%), आणि मध्य पूर्व (3.17 %) या देशांचा क्रमांक लागतो. अमेरिकन डॉलर्सच्या  मूल्याच्या बाबतीत 25.90% वाटा असलेल्या ब्लॅक टायगर कोळंबीसाठी यूएसए ही प्रमुख बाजारपेठ बनली असून, त्यानंतर युरोपियन युनियन (23.78%) आणि जपान (22.71%) आहेत.

इतर मत्स्य उत्पादने निर्यातीमध्ये दुसरया क्रमांकावर असून त्याचे निर्यातमूल्य रु.3,979.99 कोटी (540.73 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) आहे. ज्याचे परिमाण 12.96% आणि डॉलरच्या प्रमाणातील  कमाई 6.97% आहे. इतर मत्स्य उत्पादनांमध्ये निर्यातीत रुपयाच्या मूल्यात 43.80 टक्के आणि डॉलरच्या मूल्यात 42.94 टक्के वाढ झाली आहे. इतर उत्पादनांमध्ये सुरीमी आणि सुरीमी अॅनालॉग उत्पादनांचा अमेरिकन डॉलर्स मूल्यानूसार 56.55%  इतका वाटा आहे.

सर्वात जास्त निर्यात झालेल्या उत्पादनांमध्ये गोठवलेले मासे (फ्रोझन फिश), या प्रकाराने रु. 3471.91 कोटी (471.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) सह तृतीय स्थान पटकावले असून ज्याचे परिमाण 16.55 टक्के आणि डॉलरच्या प्रमाणातील  कमाई 6.08 टक्के आहे. गोठवलेल्या माशांच्या निर्यातीच्या प्रमाणात 20.44% आणि डॉलर मूल्यात 17.19% वाढ झाली आहे.

गोठवलेल्या स्क्विड (फ्रोझन स्क्विड) ची निर्यात, 75,750 मेट्रिक टन एवढी आहे,  एकूण परिमाणात 23.82% आणि डॉलरच्या बाबतीत 40.24% ची वाढ दर्शविली आणि रु. 2,806.09 कोटी (383.37 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) कमावले.

गोठवलेल्या कटलफिश (फ्रोझन कटलफिश ) ची निर्यात, 58,992 मेट्रिक टन इतकी आहे, रुपये मूल्यात 26.83 % आणि अमेरिकन डॉलर्सच्या  मूल्यात 26.18 % वाढ दर्शविली आणि 2062.63 कोटी रुपये (280.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) कमावले.

73,679 मेट्रिक टन सुकवलेल्या (ड्राइड़ )माशांच्या निर्यातीत रुपयाच्या मूल्यात 28.27% ची वाढ दर्शविली परंतु अमेरिकन डॉलर्सच्या  मूल्यात 8.59% घट झाली आणि रु.1472.98 कोटी (143.46 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) कमावले.

आश्वासक क्षेत्र मानल्या जाणाऱ्या फ्रेश-चील्ड माशांच्या निर्यातीतही परिमाणाच्या दृष्टीने 23.08% आणि रुपयाच्या दृष्टीने 53.45% ने वाढ झाली, परंतु अमेरिकन डॉलर्स मध्ये 1.87 टक्क्यांनी घसरण झाली.

जीवंत माशांच्या निर्यातीत, 7,032 मेट्रिक टन, परिमाणात 60.57%, रुपये मूल्यात 47.43% आणि अमेरिकन डॉलर्स मध्ये 46.67% एवढी वाढ दर्शविली गेली आहे .

गोठवलेली कोळंबी, गोठवलेले कटलफिश, गोठवलेले स्क्विड, सुकविलेले मत्स्य प्रकार आणि इतर मत्स्योत्पादनांमध्ये युनिट मूल्य प्राप्तीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहे.

परदेशातील बाजारपेठांसाठी, 3371.66 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स  किमतीच्या आयातीसह मूल्य आणि परिमाण या  दोन्हीमध्ये अमेरिका  भारतीय सागरी उत्पादनांचा  प्रमुख आयातदार राहिला ,ज्याचा अमेरिकी डॉलर मूल्याच्या संदर्भात 37.56 % इतका वाटा राहिला. अमेरिक मधील निर्यात परिमाणात 27.63%, रुपयाच्या मूल्यात 36.76% आणि अमेरिकी डॉलर्सच्या मूल्यात कमाईत 37.56% वाढ नोंदवली गेली. फ्रोझन कोळंबी हा अमेरिकेला  निर्यात होणारा प्रमुख प्रकार आहे आणि व्हन्नामी कोळंबीच्या निर्यातीत परिमाणात 26.81% आणि डॉलरच्या मूल्यात 34.65% वाढ झाली. अमेरिकेला ब्लॅक टायगर कोळंबीची निर्यात परिमाणाच्यानुसार 68.99% आणि अमेरिकी डॉलर मूल्याच्या संदर्भात 152.06% वाढली.

1,175.05 दशलक्ष  अमेरिकी डॉलर किमतीच्या 2,66,989 मेट्रिक टन च्या आयातीसह परिमाणानुसार भारतातून निर्यात होणाऱ्या समुद्री खाद्य प्रकारा मध्ये चीन दुसऱ्या क्रमांकाचे निर्यात गंतव्यस्थान म्हणून उदयास आले, ज्याचे प्रमाण 19.50% आणि डॉलरच्या दृष्टीने 15.14% आहे. चीनच्या बाजारपेठेतील निर्यात परिमाणात 22.28% आणि रूपये मूल्यात 31.09% आणि अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्यात 25.12% इतकी वाढ झाली. फ्रोझन कोळंबी, चीनला निर्यात होणारा प्रमुख प्रकार आहे त्यात, 47.07% परिमाणात आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यात 67.04%, तर गोठवलेल्या माशांचा वाटा परिमाणात 32.10% आणि मूल्याच्या बाबतीत 15.19% होता. भारतातून चीनला निर्यात झालेल्या गोठवलेल्या कोळंबीमध्ये परिमाण आणि आकारमानात सकारात्मक वाढ दिसून आली आहे.

गोठवलेल्या कोळंबीसह भारतीय सागरी उत्पादनांसाठी युरोपियन युनियन हे तिसरे सर्वात मोठे गंतव्यस्थान बनले आहे, परिमाणात आणि डॉलरच्या मूल्यात अनुक्रमे 29.11% आणि 37.09% वाढ नोंदवली आहे.

दक्षिण पूर्व आशिया ही चौथी मोठी बाजारपेठ आहे. 22.29% वाढीसह गोठवलेली कोळंबी, निर्यातीतील प्रमुख प्रकार आहे, परिमाणात 18.36% आणि अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्यानुसार त्याची किंमत 36.81% इतकी आहे. गोठवलेले मासे 82.24% वाढीसह 33.42% परिमाण आणि अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्यानुसार 21.42% वाटा असलेला, निर्यातीचा दुसरा प्रमुख प्रकार आहे .

अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्याच्या दृष्टीने 5.68% आणि परिमाणात 6.60% सह जपान पाचव्या क्रमांकाचा आयातदार बनला, अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्यामध्ये 6.95% ची वाढ नोंदवली गेली. तसेच गोठवलेली कोळंबी त्यामध्ये 74.55% आहे आणि अमेरिकी डॉलर्सच्या  मूल्यात 3.73% वाढीसह गोठवलेली कोळंबी जपानला निर्यात झालेला प्रमुख प्रकार आहे .

मध्यपूर्वेतील निर्यातीतही परिमाणात 20.2%, रुपयात 21.27% आणि अमेरिकी डॉलरच्या बाबतीत 20.70% वाढ झाली आहे.

***

Jaydevi PS/BS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838187) Visitor Counter : 234


Read this release in: Telugu , Tamil , English , Urdu , Hindi