गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2014 पासून भारताने जगातील सर्वात मोठा नियोजनबद्ध शहरीकरण कार्यक्रम आणि विविध परिवर्तनात्मक धोरणे आणि बदलांसाठीचे उपक्रम हाती घेतले आहेत : हरदीप एस. पुरी

Posted On: 29 JUN 2022 8:57PM by PIB Mumbai

 

भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची नागरी व्यवस्था असून, जगातील एकूण नागरी लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकसंख्या एकट्या भारतातल्या शहरांमध्ये आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, 2018 ते 2050 या काळात भारतातील नागरी लोकसंख्येत, सुमारे 416 दशलक्ष लोकांची वाढ होईल. भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यात, शहरांचे महत्वाचे योगदान आहे, त्याशिवाय, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टप्राप्तीतही, भारतातील शहरांचे वेगळे महत्त्व आहे. असे, ते म्हणाले. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात शहरांचा वाटा 70 टक्के आहे. त्याचवेळी, हरितगृह वायू उत्सर्जनात देखील शहरांचा 44 टक्के वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय कुमार यांनी पोलंड,कोटाविस येथे,28 जून रोजी आयोजित , पोलंड 11 व्या जागतिक नागरी मंचाच्या मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत हरदीप सिंह पुरी यांचे भाषण वाचून दाखवले.

भारताच्या शहरी विकासाचा प्राधान्यक्रम ठरवणारी उतरंड (पिरामिड रचना) सहकार आणि स्पर्धात्मक संघराज्य, मूलभूत सेवांचे सार्वत्रिकीकरण आणि ग्रामीण-शहरी सातत्य यावर आधारित आहे, असे हरदीप पुरी म्हणाले.  याचा पाया सर्वांसाठी घरेआणि स्वच्छ भारत मिशनयोजना आहेत,  ज्या अनुक्रमे गृहनिर्माण आणि स्वच्छता या मूलभूत गरजा पूर्ण करतात. विशेषतः स्वच्छ भारत अभियाना'ने, जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवली आहे आणि शहरांचे आमचे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

भारताच्या स्मार्ट सिटी अभियानामुळे नागरिक-केंद्री उपक्रमांद्वारे 100 स्मार्ट शहरांमध्ये जीवनमानाचा दर्जा कमालीचा उंचावला आहे, असेही, पुरी यांनी सांगितले.  पीएम फेरीवाले स्वनिधी  हा एक अत्यंत वेगळा उपक्रम असून, त्याद्वारे ज्यात रस्त्यावरील विक्रेत्यांना तारणमुक्त भांडवली कर्ज कर्ज दिले गेले. या उपक्रमामुळे, महामारीच्या कठीण काळात हा सर्वात असुरक्षित दुर्बल घटक तग धरू शकला, असेही पुरी म्हणाले.

वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानाचे पालन करणारा देश म्हणून, भारत सहकारी राष्ट्रांसोबत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचे महत्त्व जाणतो, असे पुरी म्हणाले.  या 11 व्या जागतिक मंचामुळे  आपल्याला नम्रतेने शिकण्याची आणि आमचे अनुभव एकमेकांना सांगण्याची संधी मिळाली आहे. याद्वारे, आपण समृद्ध आणि शाश्वत जगाच्या निर्मितीच्या सामायिक ध्येयाचा पाठपुरावा करु शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838094)