संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जलदगती एक्सपेंडेबल एरियल टार्गेट- अभ्यासची ओडिशाच्या किनारपट्टीवर यशस्वीपणे उड्डाण चाचणी

Posted On: 29 JUN 2022 8:26PM by PIB Mumbai

 

अभ्यास- ह्या जलदगती एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची आज म्हणजे 29 जून 2022 रोजी ओदिशाच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरुन उड्डाण चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान, लढावू विमानाची कमी उंचीवरील कामगिरी, स्थिर पातळी या निकषांवर तपासण्यात आली.

या टार्गेट लढावू विमानाचे जमिनीवरील कंट्रोलरमधून पूर्व-निर्धारित कमी उंचीच्या उड्डाण मार्गावर उड्डाण केले गेले. विविध ट्रॅकिंग सेन्सर्सद्वारे त्यावर आणि रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकलवर देखरेख ठेवली गेली. 

अभ्यासची संरचना आणि विकास, डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने केले आहे. वाहनाला प्रारंभिक वेग प्रदान करणारे हवाई दुहेरी अंडर-स्लंग बूस्टर वापरुन, याचे प्रक्षेपण केले गेले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/PIC(2)Y7EP.JPG

या विमानाला छोट्या गॅस टर्बाइन इंजिनाची शक्ती मिळाली आहे. त्यामुळे, उच्च सबसोनिक वेगाने दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी उड्डाण केले जाते. टार्गेट विमानात दिशादर्शनासाठी मायक्रो-इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम-आधारित इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली आणि नियंत्रणासाठी विमान नियंत्रण संगणकासह अतिशय कमी उंचीवरील उड्डाणासाठी स्वदेशी रेडिओ अल्टिमीटर आणि भूमीवरील नियंत्रण स्टेशन आणि टार्गेट यांच्यातील कोड असलेल्या डेटा लिंकसह सुसज्ज आहे.  पूर्णपणे स्वायत्त उड्डाणासाठी योग्य ठरेल अशी याची  रचना करण्यात आलेली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि उद्योग यांचे अभ्यास च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी. सतीश रेड्डी यांनी प्रणालीच्या डिझाइन, विकास आणि चाचणीशी संबंधित संघांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1838086) Visitor Counter : 142