पंतप्रधान कार्यालय
मुंबईत इमारत कोसळून झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत देखील जाहीर केले.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे ," मुंबईत इमारत कोसळून झालेल्या जीवित हानीने व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान मोदी"
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837760)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam