इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एमएसएमई ना सायबर सुरक्षा निर्देश लागू करण्याची आणि सदस्य/ग्राहकांच्या तपशीलांच्या प्रमाणीकरणाची मुदत सीईआरटी-इन ने 25 सप्टेंबर, 2022 पर्यंत वाढवली


या निर्णयामुळे एमएसएमई ना 28.04.2022 रोजी लागू करण्यात आलेले सायबर सुरक्षा निर्देश लागू करण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करता येणार

विदा केंद्र, व्हीपीएस पुरवठादार, क्लाउड सेवा पुरवठादार आणि व्हीपीएन सेवा पुरवठा दारांना देखील सदस्य/ग्राहकांच्या तपशिलांच्या प्रमाणीकरणाशी संबंधित यंत्रणा लागू करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली

Posted On: 28 JUN 2022 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022 

 

इंडियन कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ही माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या 70B कलमा अंतर्गत केलेल्या तरतुदींनुसार देशाच्या सायबर सुरक्षा क्षेत्रात विविध कामे करण्यासाठीची राष्ट्रीय संस्था आहे. सीईआरटी-इन सतत सायबर धोक्यांचे विश्लेषण करते आणि मागोवा घेण्यात आलेल्या सायबर घटना हाताळून त्यावर प्रतिसाद देते. देशात खुल्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच उत्तरदायी इंटरनेचा प्रचार करण्यासाठी सीईआरटी-इन ने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 70B(6) कलमा अंतर्गत माहिती सुरक्षा पद्धतींशी संबंधित अधिकार बजावण्यासाठीचे निर्देश 28 एप्रिल, 2022 रोजी जारी केले आहेत.

त्यानंतर, सीईआरटी-इन कडे प्राप्त झालेल्या सर्वसामान्य शंकांना उत्तर देण्यासाठी, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा (FAQs) संच असलेले दस्तऐवज देखील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता राज्य मंत्री, राजीव चन्द्रसेखर यांनी  18 मे, 2022  रोजी प्रकाशित केले, ज्यायोगे विविध भागधारकांना याची अधिक चांगली माहिती मिळेल तसेच देशात खुल्या, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी इंटरनेटचा प्रचार होईल.     

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) सायबर सुरक्षेबाबत 28 एप्रिल , 2022  रोजी  जारी करण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठीची मुदत वाढवावी अशी विनंती   एमईआयटीवाय (MeitY) आणि सीईआरटी-इन यांना प्राप्त झाली आहे.

त्याचप्रमाणे, विदा केंद्र, खासगी आभासी सेवा पुरवठादार (VPS), क्लाउड सेवा पुरवठादार आणि खासगी आभासी नेटवर्क सेवा पुरवठादार (VPN Service) यांच्या  सदस्य/ग्राहकांचे प्रमाणीकरण करण्यासाठीची यंत्रणा लागू करायला अतिरिक्त वेळ मागण्यात आली आहे.

हे प्रकरण सीईआरटी-इन ने विचारात घेतले असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सायबर सुरक्षा निर्देश लागू करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता विकसित करता यावी यासाठी 25 सप्टेंबर 2022  पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याशिवाय, विदा केंद्र, खासगी आभासी सेवा पुरवठादार (VPS), क्लाउड सेवा पुरवठादार आणि खासगी आभासी नेटवर्क सेवा पुरवठादार (VPN Service) यांना देखील आपल्या  सदस्य/ग्राहकांच्या तपशीलांबाबत पैलूंच्या प्रमाणीकरणासाठीची  यंत्रणा लागू करायला 25 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश https://www.cert-in.org.in/Directions70B.jsp या लिंक वर उपलब्ध आहे.

वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा (FAQs) अतिरिक्त संच देखील https://www.cert-in.org.in/Directions70B.jsp या लिंक वर प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये सीईआरटी-इन कडे नुकत्याच प्राप्त झालेल्या शंकांचे निराकरण करण्यात आले आहे.          

 

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837567) Visitor Counter : 184