आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाने पार केला 197.31 कोटीचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील किशोरांना दिल्या पहिल्या लसीच्या 3.64 कोटी हून अधिक मात्रा

भारताची सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 96,700

गेल्या 24 तासात 11,793 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.57%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.36%

Posted On: 28 JUN 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड 19 लसीकरणाची व्याप्ती 197.31 कोटीहून अधिक (1,97,31,43,196)  पर्यंत पोहचली आहे. 2,56,30,111 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य करण्यात आले आहे.

 

12 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 पासून कोविड19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत 3.64 कोटी (3,64,58,204)  हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आलेली एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,799

2nd Dose

1,00,62,793

Precaution Dose

56,54,058

FLWs

1st Dose

1,84,23,438

2nd Dose

1,76,22,829

Precaution Dose

1,00,88,287

Age Group 12-14 years

1st Dose

3,64,58,204

2nd Dose

2,29,25,965

Age Group 15-18 years

1st Dose

6,03,58,595

2nd Dose

4,85,54,875

Age Group 18-44 years

1st Dose

55,81,70,414

2nd Dose

50,06,89,143

Precaution Dose

27,62,110

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,33,447

2nd Dose

19,32,99,418

Precaution Dose

24,74,671

Over 60 years

1st Dose

12,72,42,917

2nd Dose

12,07,21,650

Precaution Dose

2,37,91,583

Precaution Dose

4,47,70,709

Total

1,97,31,43,196

 

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 96,700 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.22% इतकी आहे

 

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण बरे होण्याचा दर 98.57% इतका आहे. गेल्या 24 तासात,  9,486 रूग्णबरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून)  4,27,97,092 इतकी झाली आहे. 

गेल्या 24 तासांत  11,793  नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली. 

गेल्या 24 तासात,  एकूण 4,73,717  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 86.14  कोटी (86,14,89,400) इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 3.36%  इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.49% असल्याची नोंद झाली आहे. 

 

****

S.Tupe/R.Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837490) Visitor Counter : 156