आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.11 कोटी मात्रांचा टप्पा पार केला


12 ते 14 वयोगटातील किशोरांना लसीच्या 3.63 कोटी पहिल्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रूग्ण संख्या 94,420

गेल्या 24 तासांत, 17,073 नव्या रूग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.57 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.39 टक्के

Posted On: 27 JUN 2022 9:29AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.11  कोटीहून अधिक(1,97,11,91,329) मात्रांचा टप्पा पार केला. 2,55,80,569 सत्रांच्या माध्यमातून हे साध्य करण्यात आले.

12 ते 14 वयोगटातील किशोरांसाठी कोविड-19 प्रतिबंधक  लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.63 कोटीहून अधिक  (3,63,25,473)  किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील नागरिकांना कोविड—19 प्रतिबंधक खबरदारीच्या मात्रेचे लसीकरण 10 एप्रिल 2022 रोजी सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,715

2nd Dose

1,00,61,938

Precaution Dose

56,33,153

FLWs

1st Dose

1,84,23,127

2nd Dose

1,76,21,255

Precaution Dose

1,00,17,163

Age Group 12-14 years

1st Dose

3,63,25,473

2nd Dose

2,26,05,533

Age Group 15-18 years

1st Dose

6,03,10,898

2nd Dose

4,83,94,953

Age Group 18-44 years

1st Dose

55,81,18,357

2nd Dose

50,02,44,468

Precaution Dose

25,77,906

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,25,151

2nd Dose

19,32,03,498

Precaution Dose

23,70,927

Over 60 years

1st Dose

12,72,35,709

2nd Dose

12,06,58,820

Precaution Dose

2,35,54,285

Precaution Dose

4,41,53,434

Total

1,97,11,91,329

 

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 94,420 इतकी आहे. हे प्रमाण देशात आढळलेल्या एकूण कोरोना रूग्णांपैकी 0.22% टक्के आहे.

परिणामी,  भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.58 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 15,208 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची एकूण संख्या (महासाथीच्या आरंभापासून) आता 4,27,87,606. इतकी आहे.

गेल्या 24 तासात, 17,073 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात, 3,03,604 कोविड-19  चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 86.10 कोटी(86,10,15,683) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्याच्या घडीला  3.39 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 5.62 टक्के असल्याची नोंद झाली आहे.

***

Jaydevi PS/BS/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837228) Visitor Counter : 169