सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंमली पदार्थ सेवन विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नशा मुक्त भारत अभियान रन चे  आयोजन

Posted On: 26 JUN 2022 4:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागातर्फे आज जवाहरलाल नेहरू स्टेडियम, भीष्म पितामह मार्ग, प्रगती विहार, नवी दिल्ली येथे नशा मुक्त भारत अभियान रन अंतर्गत 19 व्या  " अंमली पदार्थ सेवन विरोधी रन " चे आयोजन करण्यात आले आहे.  हेल्थ फिटनेस ट्रस्ट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या रनचे आयोजन करण्यात आले आहे.  तरुणांना आणि इतरांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि आपला देश  अंमली पदार्थ  मुक्त करण्यासाठी, यावेळी सर्व सहभागींना एक प्रतिज्ञा देखील दिली गेली.

अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध जनजागृती  करण्यासाठी आयोजित रन ला   केंद्रीय  सामाजिक न्याय आणि  सक्षमीकरण  मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही शपथ घेतली गेली.

अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी 26 जून हा दिवस  अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.  त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात एकजूट दाखवण्यासाठी या रनचे आयोजन करण्यात आले आहे.

"नशा मुक्त भारत अभियान" हे देशव्यापी अभियान देशातील 272 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.  या 272 जिल्ह्यांमध्ये 8000 हून अधिक स्वयंसेवक आहेत, जे आतापर्यंत प्रत्यक्षात राबविलेल्या विविध उपक्रमांद्वारे 1.20 कोटींहून अधिक तरुण आणि 31 लाखांहून अधिक महिलांसह 3.10 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहेत.  आतापर्यंत, नशा मुक्त भारत अभियानाचे परिणाम खूप उत्साहवर्धक आहेत आणि  मंत्रालयाने आखून दिलेल्या  परिसीमेनुसार  वर्ष 2022 च्या अखेरीस 100 जिल्हे अंमली पदार्थमुक्त घोषित करण्यासाठी जोमाने काम करत आहे.

अंमली पदार्थांबाबतची वस्तुस्थिती सांगा आणि जीव वाचवा ही या वर्षीची या दिवसाची संकल्पना आहे.आरोग्याला असलेले जोखीम आणि जागतिक अंमली पदार्थांबाबतच्या समस्येवरील उपायांपासून ते पुराव्यावर आधारित प्रतिबंध, उपचार आणि काळजी घेणे . अंमली पदार्थांवरील वास्तविक तथ्ये सामायिक करून चुकीच्या माहितीला लगाम घालणे, हा हेतू  या संकल्पने मागे आहे.

नशा मुक्त भारत अभियान रन - 19 "अंमली पदार्थ सेवन विरोधी रन"  ह्या उपक्रमा अंतर्गत 1 किमी, 5 किमी, 10 किमी धावणे, जुंबा प्रशिक्षण वर्ग आणि एरोबिक्सचे आदींचे  आयोजन केले आहे.

***

Jaydevi PS/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837109) Visitor Counter : 2052