पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशात पिलीभीत इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 23 JUN 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2022

 

उत्तर प्रदेशात पिलीभीत इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबरोबरच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी कामनाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट संदेशात म्हटले आहे:

"उत्तर प्रदेशच्या पीलीभीत इथे झालेला रस्ते अपघात  हृदय विदीर्ण करणारा आहे. यात आपल्या जीवलगांना ज्यांनी गमावले आहे त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. याबरोबरच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी कामना करतो.: पंतप्रधान @narendramodi"

 

S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836522) Visitor Counter : 144