संरक्षण मंत्रालय

अग्निपथ - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली भारतीय तटरक्षक दल, नागरी संरक्षण दलातील पदे आणि सार्वजनिक क्षेत्रातील 16 संरक्षण उपक्रमांमधल्या नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी  10% आरक्षणाला मान्यता

Posted On: 18 JUN 2022 3:34PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10% जागा आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. हे 10% आरक्षण भारतीय तटरक्षक दल, नागरी संरक्षण दलातील पदे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 16 संरक्षण उपक्रमांमध्ये लागू केले जाईल - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड. (BDL), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL), हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL), माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL), मिश्र धातू निगम (Midhani) लिमिटेड, आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) ,  ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंटस लिमिटेड (AW&EIL), म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), ग्लायडर्स इंडिया लिमिटेड (GIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (IOL) आणि ट्रूप कम्फर्टस् लिमिटेड (TCL).  हे आरक्षण माजी सैनिकांसाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असेल.

या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित भर्ती  नियमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील. सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमांना त्यांच्या संबंधित भर्ती  नियमांमध्ये तशाच प्रकारच्या सुधारणा करण्याचा सल्ला दिला जाईल. वरील पदांवर अग्निवीरांची भर्ती  करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक वयोमर्यादेतील शिथिलता  तरतूद देखील केली जाईल.

***

S.Kakade/S.Auti/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835116) Visitor Counter : 231