कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

‘अग्निपथ’मुळे भारतीय सशस्त्र दलांमध्‍ये तरुण आणि कुशल मनुष्‍यबळ निर्माण करण्‍यासाठी चालना मिळेल

Posted On: 17 JUN 2022 3:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी अग्निपथ योजना जाहीर केली. या योजनेमुळे  देशाच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे शक्‍य होणार आहे; तसेच  तरुणांना देशसेवेच्या संधी निर्माण होणार आहेत. सैनिकी कार्याच्या माध्यमातून भारताच्या संपूर्ण संरक्षण सज्जतेमध्ये युवामंडळीचे योगदान असणार आहे आणि  अशा कुशल तरुणांचा एक मोठा समूह तयार करण्यासाठी अग्निपथही योजना म्हणजे एक परिवर्तनकारी पाऊल आहे. तसेच युव‍क कौशल्य आणि अनुभवाने स्वतःसाठी संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावू शकणार आहेत.

कुशल भारत आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) यांना  अग्निपथ योजनेशी निगडीत असल्याचा अभिमान वाटतो आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सशस्त्र दलांबरोबर  एकत्रितपणे  काम करणे आणि  राष्‍ट्राच्या  भविष्यासाठी  भारतीय तरूणांची फौज तयार करण्‍याचे काम अभिमानाचे असल्याचे म्हटले आहे.

कुशल भारत आणि एमएसडीई  सशस्त्र दलांच्या विविध शाखांबरोबर  सहकार्याने काम करणार आहे  आणि विद्यार्थ्यांना या सैन्यातल्या  नोकरीबरोबरच पुढील जीवनामध्‍ये  अधिक योग्य बनवण्यासाठी त्यांना अतिरिक्त कौशल्यांचे प्रशिक्षण देणार आहे.

याशिवाय, सर्व अग्निवीरांना सेवेत असताना कुशल भारतचे प्रमाणपत्र मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा सेनेतला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकरीच्या भूमिकेत अनेक वैविध्यपूर्ण संधींचा पाठपुरावा करणे त्यांना शक्य होईल.

कुशल भारतच्या सर्व संस्था - प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), विविध क्षेत्रातील कौशल्य परिषद, उद्योजकता संस्था NIESBUD आणि IIE, तसेच कौशल्य नियामक NCVET, या सर्व कार्यान्वयामध्‍ये सहभागी असणार आहेत; त्यामुळे अग्निवीरांना ते सैन्याच्‍या सेवेत असताना त्यांच्या नोकरीच्या भूमिकेशी संबंधित आवश्यक कौशल्य प्रमाणपत्रे मिळविता येणार आहेत.  नोकरीत असताना शिकलेली काही कौशल्ये NSQF अभ्यासक्रमाशी थेट समतुल्य असू शकतात. काहींसाठी, अतिरिक्त ऑनलाइन किंवा ऑफलाइन, सैद्धांतिक  किंवा प्रात्यक्षिक  कौशल्यांसह त्यांना नोकरीचाही अनुभव देणार आहेत. याचा लाभ युवकांना पुढील आयुष्‍यात होणार आहे. कौशल्‍य घेतलेला तपशील, तसेच सशस्त्र दलांसाठी प्रशिक्षण मूल्यांकनकर्त्यांसाठी घेतलेले  कोणतेही प्रशिक्षण पुढे उपयोगी पडणार आहे. यासाठी सैन्याकडून, मूल्यांकन आणि प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.  या सर्व पैलूंवर काम केले जात आहे. युवक सैन्‍य प्रशिक्षणातून बाहेर पडेल, त्यावेळी, संपूर्ण कौशल्यविषयक पूरक व्यवस्था या तरुण अग्निवीरांसाठी खुली असणार आहे. त्यामुळे  त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली अनेक उन्नत कौशल्‍ये/ बहुपयोगी कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता अभ्यासक्रमांचा त्यांना फायदा होईल.

अग्निपथ योजना परिवर्तनकारी आहे. याचा परिणाम भारताच्या निरंतर वाढीसाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण  असलेल्या राष्ट्र-प्रथम’  यांसारख्या आपल्या लष्कराच्या मूलभूत मूल्यांसह कुशल, तज्‍ज्ञ तांत्रिक, तरुण मनुष्‍यबळ निर्माण होणार आहे. अग्निवीर आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि  आधुनिक, तंत्रज्ञानाच्या जोरावर  भारताला,  तरुण जागतिक महासत्ता बनण्याच्या जवळ घेऊन जाण्यासाठी एक महत्‍वपूर्ण संपत्ती ठरतील.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834897) Visitor Counter : 200