पंतप्रधान कार्यालय

साधेपणा हेच योगाभ्यासाचे सौंदर्य : पंतप्रधान

Posted On: 15 JUN 2022 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2022

साधेपणा हे योगाभ्यासाचे  सौंदर्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. घरी,कामाच्या ठिकाणी मिळालेल्या सुटीत किंवा एखाद्या गटाबरोबर योगासने  करता येतात. योगासने करण्यासाठी केवळ  एक चटई (योग मॅट ) आणि काहीशा  मोकळ्या जागेची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"साधेपणा हेच योगाभ्यासाचे  सौंदर्य आहे. यासाठी योगा मॅट आणि  थोडी मोकळी  जागा इतकेच पुरेसे  आहे.

घरी,कामाच्या ठिकाणी मिळालेल्या सुटीत किंवा एखाद्या गटाबरोबर योगासने  करता येतात.

तुम्ही नियमित योगासनांचा सराव  कराल अशी मला आशा आहे..."

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1834343) Visitor Counter : 169