आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
अहमदाबादमध्ये धोलेरा येथे नवा ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
14 JUN 2022 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने, गुजरातमध्ये धोलेरा येथे नवे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. यासाठी 1305 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 48 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
हा प्रकल्प 'DIACL म्हणजेच धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी मर्यादित'मार्फत साकारला जाणार आहे. DIACL ही भारतीय विमानतळ प्राधिकरण, गुजरात सरकार आणि NICDIT अर्थात राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकसन आणि अंमलबजावणी न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने अस्तित्वात आलेली कंपनी आहे. DIACL मध्ये या तिघांच्या हिश्श्याचे प्रमाण 51:33:16 असे आहे.
DSIR अर्थात धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रातून प्रवासी आणि कार्गोची आवक-जावक धोलेरा विमानतळामार्फत होणार असून, सदर औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरेल असे प्रमुख कार्गो वाहतूक केंद्र म्हणून धोलेरा नावारूपाला येण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादसाठी आणि जवळच्या अन्य भागांसाठी दुसरा/ पर्यायी विमानतळ म्हणूनही या विमानतळाचा उपयोग होऊ शकणार आहे.
हा धोलेरा येथील नवा ग्रीनफिल्ड विमानतळ अहमदाबादपासून 80 किमी इतक्या हवाई अंतरावर असेल. वर्ष 2025-26 पासून हा विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रारंभी दरवर्षी 3 लाख प्रवासी येथून प्रवास (आगमन-निर्गमन मिळून) करण्याचा अंदाज आहे. तर आगामी 20 वर्षांत येथून प्रवास करणाऱ्या (आगमन-निर्गमन मिळून) प्रवाशांची संख्या 23 लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वर्ष 2025-26 पासून वार्षिक कार्गो आवक-जावक 20,000 टन होण्याचा अंदाज असून आगामी 20 वर्षांत कार्गो आवक-जावक 2,73,000 टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
* * *
R.Aghor/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833963)
Visitor Counter : 228
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam