मंत्रिमंडळ
भारत आणि अमेरिका यांच्यातील आरोग्यविषयक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
08 JUN 2022 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि अमेरिकेतील इंटरनॅशनल AIDS व्हॅक्सीन उपक्रम (IAVI) यांच्यातील स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. एचआयव्ही, क्षयरोग, कोविड-19 आणि इतर उदयोन्मुख संसर्गजन्य आणि दुर्लक्षित आजारांना प्रतिबंध आणि त्या आजारांवर उपचार करण्यासाठी नवीन, सुधारित आणि नाविन्यपूर्ण जैववैद्यकीय साधने आणि तंत्रज्ञानाच्या विकासात हा करार योगदान देईल.
या करारामुळे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार आहेत.
* * *
R.Aghor/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832270)
Visitor Counter : 178
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam