संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे व्हिएतनामी समपदस्थ जनरल फान व्हॅन गिआंग यांची हनोई येथे द्विपक्षीय चर्चा


संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी 2030 च्या दिशेने भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारी संयुक्त दृष्टीकोन घोषणापत्रावर स्वाक्षरी

परस्पर लाभाच्या लॉजिस्टिक सहाय्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावरही स्वाक्षरी

Posted On: 08 JUN 2022 10:58AM by PIB Mumbai

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 08 जून 2022 रोजी हनोई येथे व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गिआंग  यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रभावी आणि व्यावहारिक उपक्रम राबवण्यासंदर्भात तसेच प्रादेशिक आणि जागतिक समस्यांबद्दल
 दोन्ही बाजूंनी व्यापक चर्चा झाली. उभय देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी 2030 च्या दिशेने  भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारी संयुक्त  दृष्टीकोन घोषणापत्रावर    स्वाक्षरी केली, यामुळे विद्यमान संरक्षण सहकार्याची व्याप्ती आणि प्रमाण लक्षणीयरित्या वाढणार आहे


उभय  मंत्र्यांच्या उपस्थितीत परस्पर लॉजिस्टिक सहाय्याबाबतच्या  सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमधील वाढत्या सहकार्य प्रतिबद्धतेच्या  या काळात,परस्पर लाभाची  लॉजिस्टिक सहाय्य प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे आणि व्हिएतनामने कोणत्याही देशासोबत केलेला हा पहिलाच मोठा करार आहे.


 व्हिएतनामला  500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या  संरक्षण पत सहाय्याला  लवकर अंतिम स्वरूप  देण्यावरही  उभय मंत्र्यांनी सहमती दर्शविली.प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे व्हिएतनामच्या संरक्षण क्षमतेत आणि   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टीकोनात  भर पडणार आहे. .

व्हिएतनामी सशस्त्र दलांच्या क्षमता बांधणीसाठी हवाई दल अधिकारी प्रशिक्षण केंद्रामध्ये  भाषा आणि  माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या  स्थापनेसाठी आर्थिक अनुदान देण्याची आणि दोन सिम्युलेटर भेट म्हणून देण्याची घोषणाही  संरक्षणमंत्र्यांनी केली.  

व्हिएतनामचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांना हनोई येथील त्यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण करून, संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत दौऱ्याला  सुरुवात केली. दोन देशांमधील युगानुयुगांची संस्कृती आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध अधोरेखित करणाऱ्या ट्रॅन क्वोक पॅगोडा या वंदनीय बौद्ध विहारालाही  भेट दिली

***

S.Patil/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1832028) Visitor Counter : 256


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu