आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.43 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 3.46 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 28,857

गेल्या 24 तासात 5,233 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.72%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.12%

Posted On: 08 JUN 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.43  कोटींहून अधिक (1,94,43,26,416) मात्रांचा टप्पा पार केला. 2,48,41,726  लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत,  3.46 कोटींहून अधिक  (3,46,80,050) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,403

2nd Dose

1,00,45,028

Precaution Dose

53,30,935

FLWs

1st Dose

1,84,20,048

2nd Dose

1,75,91,938

Precaution Dose

90,01,952

Age Group 12-14 years

1st Dose

3,46,80,050

2nd Dose

1,82,75,795

Age Group 15-18 years

1st Dose

5,96,92,001

2nd Dose

4,64,78,107

Age Group 18-44 years

1st Dose

55,74,17,391

2nd Dose

49,27,06,898

Precaution Dose

12,30,636

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,96,219

2nd Dose

19,14,38,576

Precaution Dose

16,36,057

Over 60 years

1st Dose

12,71,27,190

2nd Dose

11,94,36,496

Precaution Dose

2,01,13,696

Precaution Dose

3,73,13,276

Total

1,94,43,26,416


भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या  28,857 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.07%आहे.


 

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा  दर 98.72% इतका आहे.  गेल्या 24 तासांत 3,345  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,36,710. इतकी झाली आहे.


गेल्या 24 तासात 5,233  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासात एकूण 3,13,361 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.35 कोटींहून अधिक (85,35,22,623) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.12% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  1.67%.नोंदविण्यात आला आहे.

***

Jaydevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831994) Visitor Counter : 156