ऊर्जा मंत्रालय
ग्रीन एनर्जी ओपन ऍक्सेसच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरास चालना देण्यासाठी आणखी एक मोठी सुधारणा
वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना पर्यावरणस्नेही होण्याची संधी मिळणार
Posted On:
07 JUN 2022 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
देशाच्या महत्त्वाकांक्षी अशा नवीकरणीय ऊर्जा कार्यक्रमांना आणखी गती देण्यासाठी दि. 06.06.22 रोजी, ग्रीन ओपन ऍक्सेस रुल्स, 2022 अर्थात हरित खुली प्रवेशमुभा नियम, 2022 अधिसूचित करण्यात आले.
परवडण्याजोग्या किमतीत, विश्वासार्ह, शाश्वत आणि हरित ऊर्जा सर्वांना मिळावी, हे यामागचे अंतिम उद्दिष्ट आहे.
हरित ऊर्जेची निर्मिती, खरेदी आणि वापर यास चालना देण्यासाठी हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत.
कचऱ्यातून ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांतून मिळणारी ऊर्जाही यात समाविष्ट आहे.
हरित ऊर्जेची साधने सर्वांच्या आवाक्यात असावीत यासाठीची प्रक्रिया या नियमांमुळे अधिक सोपी होऊ शकेल.
ग्रीन ओए (ओपन ऍक्सेस)करिता तसेच समान बँकिंग, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांनी स्वेच्छेने नवीकरणीय ऊर्जा विकत घ्यावी यासाठी या नियमांचा उपयोग होणार आहे.
वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना स्वेच्छेने हरित ऊर्जा विकत घेण्याची अनुमती देण्यात आली आहे.
कॅप्टिव्ह ग्राहकांना कोणत्याही किमान मर्यादेविना ग्रीन ओपन ऍक्सेसमार्फत वीज घेता येईल.
वितरण व्यवस्थेच्या ग्राहकांना हरित ऊर्जेची मागणी करता येईल.
या नियमावलीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-:
- कोणत्याही ग्राहकाला ग्रीन ओपन ऍक्सेस वापरण्याची अनुमती असेल. अशा ओपन ऍक्सेस व्यवहारांसाठीची मर्यादा 1 मेगावॉट वरून कमी करून 100 किलोवॅट करण्यात आली आहे. यामुळे छोट्या ग्राहकांनाही ओपन ऍक्सेस मार्फत नवीकरणीय ऊर्जा विकत घेता येईल.
- ओपन ऍक्सेससाठीचे अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता. मंजुरी 15 दिवसांत दिली गेली पाहिजे, अन्यथा तांत्रिक अटींच्या अधीन राहून तो मंजूर झाला असे ग्राह्य धरण्यात येईल. ही प्रक्रिया एका राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळाच्या माध्यमातून होईल.
- हरित भाडे निश्चिती- हरित ऊर्जेचे भाडे उचित आयोगाद्वारे स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येईल. त्यामध्ये नवीकरणीय ऊर्जा विकत घेण्यासाठीची सरासरी संचयित किंमत, असल्यास क्रॉस-सबसिडी आणि सेवाशुल्क यांचा समावेश असेल. ग्राहकांना हरित ऊर्जा पुरवण्यासाठी वितरण परवानाधारकाला येणाऱ्या माफक खर्चाचा विचार सेवाशुल्कात केलेला असेल.
- ओपन ऍक्सेससाठी अनुमती देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सदर नियमावलीची मदत होईल. कालबद्ध मंजुरीचा यात समावेश असेल. तसेच, नवीकरणीय ऊर्जा निर्माण करणाऱ्यांकडे येणाऱ्या रोख रकमेच्या ओघाचा अंदाज लावण्याबाबत सुधारणा होण्यासाठीही याची मदत होईल. तसेच अर्ज प्रक्रियेत यामुळे एकसमानता येईल.
- जास्तीची हरित ऊर्जा, वितरण परवानाधारकाकडे ठेवीप्रमाणे ठेवणे बंधनकारक असेल.
- हरित ऊर्जा वापरल्यास ग्राहकांना हरित प्रमाणपत्रे देण्यात येतील.
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831870)
Visitor Counter : 283