पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
05 JUN 2022 9:23PM by PIB Mumbai
उत्तराखंडमधील बस दुर्घटनेट झालेल्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ ) बस अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे
"उत्तराखंडमध्ये झालेली बस दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे.या दुर्घटनेमध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन घटनास्थळी शक्य ती सर्व मदत करत आहे :पंतप्रधान @narendramodi
"पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे ." असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
****
RG/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831482)
अभ्यागत कक्ष : 173
Read this releasein:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam