रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा

Posted On: 05 JUN 2022 6:50PM by PIB Mumbai

 

पर्यावरणीय मुद्द्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

या विश्वामध्ये अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि आपल्या आकाशगंगेत अब्जावधी  ग्रह आहेत, पण पृथ्वी एकच आहे. त्यामुळे निसर्गाशी सलोखा राखत शाश्वत जीवन जगूया यावर भर देत  या वर्षीच्या पर्यावरण दिनाच्या  मोहिमेचे घोषवाक्य Only One Earth(केवळ एक पृथ्वी ) असे ठेवण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे, भारतीय रेल्वे  या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेला  अनुसरून आज  5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन  योग्य आणि सुयोग्य पद्धतीने साजरा करत आहे.

रेल्वे हे  सार्वजनिक वाहतुकीचे मोठे पर्यावरणपूरक साधन आहे. पर्यावरण संरक्षणासाठी, प्रदूषण/जीएचजी  उत्सर्जन कमी करणे, संसाधने आणि ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देणे आणि शाश्वततेत  योगदान देणे याद्वारे पर्यावरण जपणारे उपक्रम रेल्वे सातत्याने राबवत आहे.

भारतीय रेल्वेला, बर्लिन येथे1 जून 2022 रोजी  झालेल्या समारंभातशून्य -कार्बन तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर या श्रेणीमध्ये, 25 KV AC कर्षण प्रणालीत थेट सौर ऊर्जा भरण्यासाठी यूआयसी आंतरराष्ट्रीय शाश्वत रेल्वे पुरस्काराने (ISRA) सन्मानित करण्यात आले.

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831342) Visitor Counter : 175