आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकत्रित कोविड -१९ लसीकरणाची व्याप्ती 193.83 कोटीहून अधिक


12 ते 14 वयोगटासाठी 3.42 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 21,177

गेल्या चोवीस तासांत, 4,041 नवीन रूग्णांची नोंद

रूग्ण बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.74 टक्के

सध्याच्या घडीला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.73 टक्के

Posted On: 03 JUN 2022 9:17AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या  कोविड-19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती आता 193.83 कोटी(1,93,83,72,365) पर्यंत पोहचली आहे. 2,46,63,629 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे.

12  ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी कोविड- 19 लसीकरणाची मोहीम 16 मार्च  2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत 3.42  कोटी (3,42,27,853) पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 च्या लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 10 एप्रिल 2022 रोजी 18-39 या वयोगटातील नागरिकांसाठी खबरदारी म्हणून तिसरी मात्रा देणे सुरू करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता आलेल्या एकत्रित आकडेवारीच्या अहवालाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,176

2nd Dose

1,00,42,015

Precaution Dose

52,68,465

FLWs

1st Dose

1,84,19,549

2nd Dose

1,75,87,615

Precaution Dose

88,41,461

Age Group 12-14 years

1st Dose

3,42,27,853

2nd Dose

1,71,57,137

Age Group 15-18 years

1st Dose

5,95,51,915

2nd Dose

4,60,19,813

Age Group 18-44 years

1st Dose

55,72,61,695

2nd Dose

49,10,62,169

Precaution Dose

9,75,368

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,70,633

2nd Dose

19,10,81,619

Precaution Dose

14,71,297

Over 60 years

1st Dose

12,71,05,294

2nd Dose

11,91,93,349

Precaution Dose

1,94,27,942

Precaution Dose

3,59,84,533

Total

1,93,83,72,365

 

भारतात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या आता 21,177 इतकी असून अशा रूग्णांची संख्या एकूण देशातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.05 टक्के इतकी आहे.

परिणामस्वरूप, भारताचा कोविडचे रूग्ण  बरे होण्याचा दर 98.74 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,363 रूग्ण बरे झाले आहेत आणि कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून रूग्ण  बरे झालेल्यांची एकत्रित संख्या 4,26,22,757 इतकी आहे.

गेल्या  24 तासांत, 4,041 इतक्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या  24 तासांत, एकूण 4,25,379 इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकत्रित संख्या एकूण 85.17 (85,17,63,974)

कोटी इतकी आहे. 

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 0.73 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.95 टक्के इतका आहे.

***

Jaydevi PS/UK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830708) Visitor Counter : 215