राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती 3 ते 6 जून दरम्यान उत्तर प्रदेश दौऱ्यावर

Posted On: 02 JUN 2022 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 3 ते 6 जून 2022 या कालावधीत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

3 जून, 2022 रोजी, राष्ट्रपती त्यांच्या मूळ गावी - कानपूर देहातमधील पारौंख येथे भेट देणार आहेत तेथे ते एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

4 जून 2022 रोजी, राष्ट्रपती कानपूर येथे मर्चंट्स चेंबर ऑफ उत्तर प्रदेशच्या 90 व्या वर्षाच्या समारंभाला संबोधित करणार आहेत. त्याच दिवशी ते गोरखपूर येथे गीताप्रेसच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

5 जून, 2022 रोजी, राष्ट्रपती मगहरला भेट देतील तिथे ते संत कबीर दास यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत आणि संतकबीर अकादमी आणि संशोधन केंद्र आणि स्वदेश दर्शन योजनेचे उद्घाटन करणार आहेत.

6 जून 2022 रोजी राष्ट्रपती उत्तर प्रदेश विधान मंडळाच्या विशेष संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

 

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830646) Visitor Counter : 128