गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले

Posted On: 30 MAY 2022 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जनतेचे अभिनंदन केले आहे .

ट्वीट्सच्या माध्यमातून केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेला सेवेचे माध्यम मानत गरीब, शेतकरी, महिला आणि वंचितांना त्यांचे हक्क दिले आहेत, ज्यामुळे त्यांचा लोकशाहीवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे आणि ते देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी झाले आहेत. अनेक ऐतिहासिक कामगिरीने परिपूर्ण या आठ वर्षांसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन."

शाह म्हणाले, "गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना बळ दिले आणि त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सक्षम नेतृत्वाने आणि प्रबळ इच्छाशक्तीने देशाला केवळ सुरक्षितच केले नाही तर असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मन अभिमानाने उंचावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाची प्रशंसा करताना अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या रूपात आज भारताकडे असे नेतृत्व आहे, ज्यांच्यावर प्रत्येक वर्गाला विश्वास आहे आणि अभिमान आहे आणि ते आपल्या अथक परिश्रमाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत. आज 130 कोटी भारतीयांच्या विश्वासाची ही शक्ती प्रत्येक क्षेत्रात देशाला पुढे नेत आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले, “तंत्रज्ञान असो की क्रीडा, आरोग्य असो वा संरक्षण, विकास असो किंवा गरीबांचे कल्याण असो, आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रत्येक धोरण आणि प्रत्येक कामगिरी जगासाठी एक उदाहरण आहे.”

अमित शाह म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर असो किंवा ईशान्य किंवा डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाने प्रभावित क्षेत्रे, ज्याकडे अनेक दशके पाहण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्व आणि दूरदृष्टीने विकास आणि शांततेचा नवा अध्याय लिहिला आहे. आज हा प्रदेश उर्वरित देशाच्या बरोबरीने पुढे जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प देशाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचा पाया रचत आहे. हा संकल्प सिद्धीला नेण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासियांची आहे, जेणेकरून आपण भावी पिढ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर भारत देऊ शकू.”

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1829506) Visitor Counter : 809