शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च शैक्षणिक संस्था/तांत्रिक शिक्षण संस्थांच्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोर्टल सुरु केले


या पोर्टलवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या 4 वर्षाच्या आयटीईपीची प्रक्रिया केली जाईल

एक स्वयंचलित मजबूत व्यवस्था प्रदान करून दायित्व, पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता वाढवणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे

Posted On: 29 MAY 2022 5:34PM by PIB Mumbai

 

शिक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) उच्च शैक्षणिक संस्था/तांत्रिक शिक्षण संस्थांच्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देण्याची प्रक्रिया-अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवण्यापासून ते संस्थांच्या तपासणीसह मान्यता आदेश जारी करण्याच्या टप्प्यापर्यंत सुलभ करण्यासाठी पोर्टल सुरु केले आहे. अलिकडेच सुरु करण्यात आलेल्या 4 वर्षाच्या आयटीईपी अर्जांची प्रक्रिया या पोर्टलवर केली जाईल.

हे पोर्टल राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणेल. उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता वाढवून स्वयंचलित मजबूत व्यवस्था प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

आयटीईपीसाठी ऑनलाइन अर्जांवर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेद्वारे संकेतस्थळाच्या ‘Admin Login’ द्वारे प्रक्रिया केली जाईल.

(https://ncte.gov.in/Website/admin_Panel.aspx ). त्रुटी /SCN संबंधी उच्च शैक्षणिक संस्था/तांत्रिक शिक्षण संस्थांनी केलेला सर्व पत्रव्यवहार ITEP पोर्टलवर पाठवावा लागेल. ऑनलाइन तपासणीसाठी, संबंधितांना एनसीटीई संकेतस्थळावरील VT पोर्टलवर जावे लागेल.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829222) Visitor Counter : 175